मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अजबच! चोरांनी लंपास केली अशी वस्तू, ज्याचा कोणी विचारही केला नसेल; जाणून लावाल डोक्याला हात

अजबच! चोरांनी लंपास केली अशी वस्तू, ज्याचा कोणी विचारही केला नसेल; जाणून लावाल डोक्याला हात

विशेष म्हणजे चोरट्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याच्या बहाण्याने स्थानिक विभागीय कर्मचाऱ्यांचीही मदत घेत त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण पूलच चोरून नेला.

विशेष म्हणजे चोरट्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याच्या बहाण्याने स्थानिक विभागीय कर्मचाऱ्यांचीही मदत घेत त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण पूलच चोरून नेला.

विशेष म्हणजे चोरट्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याच्या बहाण्याने स्थानिक विभागीय कर्मचाऱ्यांचीही मदत घेत त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण पूलच चोरून नेला.

पाटणा 08 एप्रिल : बिहारमधील रोहतास जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात 60 फूट लांब आणि 20 टन वजनाचा लोखंडी पूल चोरून काही चोरटे पसार झाले. चोरट्यांनी दिवसाढवळ्या ही चोरी केली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून इथे आले आणि कालव्यावरील जुना लोखंडी पूल तोडण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी हा पूल गॅस कटरने कापून जेसीबीच्या सहाय्याने काढून घेतला, यानंतर आरामात हा पूल गाडीमध्ये टाकत ते तिथून पसार झाले (Thieves Steal 60 Feet Long Bridge).

नंतर समजलं की ते पाटबंधारे विभागाचे अधिकारी नसून चोर होते. वास्तव जाणून एकीकडे ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्का बसला, तर दुसरीकडे पुलाच्या चोरीच्या घटनेने स्थानिक प्रशासनातही खळबळ उडाली आहे. मात्र हा पूल सध्या वापरात नव्हता.

Playboy होण्याच्या मोहात पुण्यातल्या तरुणाचा खेळ खल्लास, दिवसाला 3 हजार कमावण्याच्या नादात गमावले 17 लाख

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिज चोरीची ही घटना रोहतास जिल्ह्यातील नसरीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील अमियावरची आहे. येथील आरा कालव्यावर 1972 च्या सुमारास बांधलेला लोखंडी पूल चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेला. विभागीय अधिकारी म्हणून काही लोक जेसीबी, पिकअप व्हॅन, गॅस कटर आदी घेऊन आले आणि तीन दिवसांत संपूर्ण पूल गायब करून कापून घेऊन गेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याच्या बहाण्याने स्थानिक विभागीय कर्मचाऱ्यांचीही मदत घेत त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण पूलच चोरून नेला.

चोर स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा पूल कापून गाडीमध्ये टाकत राहिले. हे काम तीन दिवस सुरू होतं, पण स्थानिक कर्मचाऱ्यांना किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही त्याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे गावकरी हैराण झाले आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी खराब झालेला पूल काढत असल्याचं आपल्याला वाटलं असं ग्रामस्थ मंटू सिंग आणि शिवकल्याण भारद्वाज यांनी सांगितलं. इतकंच नाही तर यावेळी काही विभागीय कर्मचारीही घटनास्थळी चोरट्यांची मदत करत असल्याचं दिसलं, असं ग्रामस्थांनी सांगितले. यामुळे गावकऱ्यांनाही संशय आला नाही आणि संपूर्ण पूल चोरीला गेला. हा लोखंडी पूल जीर्ण झाल्याने लोक त्याचा वापर करत नव्हते. हा पूल हटवण्यासाठी ग्रामस्थांनी अर्जही केले होते.

'माझ्यावर घरातच कैदेत राहायची वेळ आलीय', महिलेचा भाजप नगरसेवकावर अश्लील हावभाव आणि विनयभंगाचा आरोप

हा लोखंडी पूल सुमारे 60 फूट लांब आणि 12 फूट उंच होता. हा पूल चोरीला गेल्यावर गावकऱ्यांना आणि विभागाला हा संपूर्ण प्रकार समजला. यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कालव्यावरील संपूर्ण लोखंडी पूलच गुन्हेगारांनी भरदिवसा ज्याप्रकारे चोरून नेला, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अर्शद कमल शमसी यांनी सांगितलं की, हा पूल वापरात नव्हता. अनेक वर्षांत पुलाचा बराचसा भाग हळूहळू चोरीला गेला. हा पूल हटवायचा होता, मात्र काही लोकांनी हा पूलच चोरल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. याप्रकरणी नसरीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Theft, Thief