जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'माझ्यावर घरातच कैदेत राहायची वेळ आलीय', महिलेचा भाजप नगरसेवकावर अश्लील हावभाव आणि विनयभंगाचा आरोप

'माझ्यावर घरातच कैदेत राहायची वेळ आलीय', महिलेचा भाजप नगरसेवकावर अश्लील हावभाव आणि विनयभंगाचा आरोप

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

महिलेचा आरोप आहे की, जेव्हा ती खिडकी उघडते, तेव्हा नगरसेवक समोर येतात आणि अश्लील हावभाव करतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

उदयपूर, 7 एप्रिल : एका विवाहित महिलेनं (married woman molestation) भाजपच्या नगरसेवकावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नगरसेवकानं आपला विनयभंग केला आणि अश्लील हावभाव (Obscene gestures) केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. यावर महिलेनं नगरसेवकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार (police complaint) दाखल केली आहे. आरोपी नगरसेवकाचे दुकानही विवाहित महिलेच्या घरासमोर आहे. महिलेचा आरोप आहे की,त्याच्या कारवायांना विरोध केल्यावर तो तिला शिवीगाळ करतो आणि भांडण करतो. संबंधित पोलिस ठाण्याचे एएसआय पुंजीलाल मीणा यांनी सांगितलं की, विवाहितेचे नगरमध्ये तीन मजली घर आहे. घराची स्वयंपाकघराची खिडकी ज्या बाजूला उघडते त्याच्या समोरच नगरसेवक दिलीप खाटीक यांचं मांसाचं दुकान आहे. महिलेचा आरोप आहे की, जेव्हा ती खिडकी उघडते, तेव्हा नगरसेवक समोर येतात आणि अश्लील हावभाव करतात. तिनं विरोध केल्यास शिवीगाळ आणि जातीवाचक प्रकरणात गोवण्याची धमकीही दिली. राजस्थानमधील उदयपूरमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. हे वाचा -  देशात 21 ग्रीनफिल्ड एअरपोर्ट्स होणार, जाणून घ्या कुठे असतील हे नवे विमानतळ एका दिवसापूर्वीही दिलीप खाटीक याने महिलेचा विनयभंग केला होता. विरोध केल्यावर विवाहितेचा पतीही आला. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. महिलेनं सांगितलं की, आरोपी तिचा पाठलाग करतो आणि अनपेक्षित कमेंटही करतो. पीडित महिलेचं म्हणणं आहे की, आरोपी नगरसेवकाच्या अशा कृत्यांमुळे ती घरात कैद होऊन जगत आहे. ती हवेसाठी खिडक्या आणि दरवाजे देखील उघडू शकत नाही. स्वयंपाकघरात अन्न बनवणंही कठीण झालं आहे. खूप सहन केल्यानंतर पोलीस ठाणं गाठायचं ठरलं, असं महिलेनं सांगितलं. या प्रकरणाचा तपास करत असलेले एएसआय पुंजीलाल यांनी सांगितलं की, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. विवाहितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. न्यायालयात विवाहितेचा जबाब नोंदवल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. आरोपी हा साळुंबर येथील प्रभाग 15 मधील भाजपचा नगरसेवक असून तो भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात