मराठी बातम्या /बातम्या /देश /शोपियानमध्ये उपचारादरम्यान एक जवान शहीद, 15 दिवसात 15 दहशतवादी ठार; पुंछमध्ये अजूनही चकमक सुरु

शोपियानमध्ये उपचारादरम्यान एक जवान शहीद, 15 दिवसात 15 दहशतवादी ठार; पुंछमध्ये अजूनही चकमक सुरु

या चकमकीत 3 जवानही जखमी झाले आहेत. यापैकी 1 जवान रुग्णालयात उपचारादरम्यान शहीद झाला.

या चकमकीत 3 जवानही जखमी झाले आहेत. यापैकी 1 जवान रुग्णालयात उपचारादरम्यान शहीद झाला.

या चकमकीत 3 जवानही जखमी झाले आहेत. यापैकी 1 जवान रुग्णालयात उपचारादरम्यान शहीद झाला.

श्रीनगर, 20 ऑक्टोबर: जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांविरोधात (terrorists) सुरक्षा दलांचं (security forces) सतत ऑपरेशन सुरु आहे. शोपियानमध्ये बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (encounter) झाली. या दरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांना (killed two terrorists)ठार केले. मात्र, या चकमकीत 3 जवानही जखमी झाले आहेत. यापैकी 1 जवान रुग्णालयात उपचारादरम्यान शहीद झाला. दोन जवान अजूनही जखमी आहेत.

शोपियान चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याची ओळख आदिल वाणी अशी आहे. जुलै 2020 मध्ये तो दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. त्याने पुलवामा येथील उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील शाकीर या मजुराची हत्या केली होती. आदिल टीआरएफचा जिल्हा कमांडर होता.

15 दिवसात 15 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीर आयजीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसात जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात 10 चकमकी झाल्या आहेत. या चकमकींमध्ये आतापर्यंत 15 दहशतवादी ठार झाले आहेत. दुसरीकडे, पुंछच्या जंगलात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून येथे चकमक सुरू आहे. सैनिकांनी जंगलात 4-6 दहशतवाद्यांना घेरलं आहे. असे सांगितले जात आहे की, सुरक्षा दल कोणत्याही वेळी दहशतवाद्यांवर शेवटचा हल्ला करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- EX Girlfriend वर वार करतानाचा Horriable Live Video

जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची कारवाई सुरू आहे. अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातील मजुरांची हत्या केली.

शोपियानमध्ये चकमक

दहशतवादविरोधी मोहिमेअंतर्गत सर्व लोकांना घरातच राहण्यास सांगितलं आहे. परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल पूर्ण सतर्क आहेत.

जवानांचे संयुक्त पथक संशयित जागेच्या दिशेनं निघाले असता, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरु झाली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

हेही वाचा- विजेचा शॉक देत पत्नीची केली भयंकर अवस्था; दुसऱ्या बायकोच्या मदतीनं नवऱ्यानं गाठला क्रूरतेचा कळस

लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे (MM Naravane) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकी संदर्भात जम्मू प्रदेशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, त्यांनी नियंत्रण रेषेसह पुढील भागांना भेटी दिल्या आणि सुरु असलेल्या ऑपरेशनचा भाग म्हणून सुरक्षा दलांना अनेक सूचना देण्यात आल्या. यासह, जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनीही रविवारी भींबर गलीला भेट दिली आणि अतिरेक्यांचा लवकरच खात्मा करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

First published:
top videos

    Tags: Terrorist