सूरत 03 एप्रिल : गुजरातच्या सूरतमध्ये (Surat) एकीकडे कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. तर, दुसरीकजे अपराधाच्या (Crime) घटनाही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. सूरतमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे नाईट कर्फ्यू (Night Curfew) लावण्यात आला आहे. यादरम्यान रस्त्यावर केवळ पोलिसच उभे असल्याचं दिसतं. मात्र, असं असतानाही काही चोरांनी केवळ घरातील सामानाची चोरी केली नाही तर वृद्धाची हत्यादेखील केली. या भामट्य़ांनी आधी वृद्धाचे हात पाय बांधले आणि यानंतर त्याची हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सूरतच्या डुमस परिसरात भूपिन भाई पटेल एकटेच राहात होते. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या घरात काही चोर शिरले. या चोरांनी आधी भूपिन भाई यांचे हात आणि पाय बांधले आणि यानंतर घरातील प्रत्येक कानाकोपरा तपासला. यादरम्यान भूपिन भाई यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात करताच चोरांनी त्यांची हत्या केली. दुसऱ्या दिवशी भुपिन यांची आई जेव्हा घरी आली तेव्हा त्यांनी पाहिलं की घरातील सर्व सामान आस्थाव्यस्थ पडलेलं आहे आणि भूपिनदेखील एका कोपऱ्यात पडलेले आहेत. यानंतर त्या जोरानं ओरडल्या आणि आसपासचे लोकही जमा झाले.
સુરત : એકલા રહેતા આધેડના હાથ બાંધી લૂંટના ઈરાદે હત્યા, સીસીટીવી વીડિયોમાં કેદ થયા 'હત્યારા' pic.twitter.com/u7FCpataNe
— News18Gujarati (@News18Guj) April 2, 2021
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण चोरीचं असल्याचं दिसत आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांना डॉग स्कॉडही सोबत आणलं होतं. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की चोरांना ही गोष्ट माहिती होती की भोपिन घरी एकटे होते. यानुसार या घटनेमागे ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपींचा तपास सुरू केला आहे.