मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरुन आई व मुलींचं धक्कादायक कृत्य; एकुलत्या एका भावाची हत्या

वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरुन आई व मुलींचं धक्कादायक कृत्य; एकुलत्या एका भावाची हत्या

हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या आईनेच मुलींना सोबत घेत स्वतःच्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे.

हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या आईनेच मुलींना सोबत घेत स्वतःच्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे.

हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या आईनेच मुलींना सोबत घेत स्वतःच्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे.

धुळे, 29 मे :  हिस्से वाटणीच्या वादातून सख्ख्या आईनेच मुलींना सोबत घेत स्वतःच्याच मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे. धुळे तालुक्यातील नंदाने गावात राहणारे रतिलाल पाटील यांचा त्यांची आई आणि दोन बहिणींसोबत वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. याच वादावरून रतीलाल पाटील व त्यांच्या बहिणीमध्ये अनेक वेळा भांडण ही झाली आहेत.

दोन दिवसांपूर्वी याच जुन्या वादावरून पुन्हा भांडण झालं. हा वाद वाढला आणि विकोपास गेला. या वादानंतर रतिलाल यांची आई येडाबाई आणि दोन बहिणीसह त्यांच्या मुलांनी रतीलाल पाटील यांच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ सुरु केली. रतीलाल यांच्या बहिणी व भाच्यांनी घरात घुसून रतिलाल यांचा मुलगा नितीन याला लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. यावेळी नितीनला वाचवायला गेलेल्या रतिलाल यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी भाच्यांनी डोक्यावर लोखंडी रोडने मारहाण केल्याने रतिलाल गंभीर जखमी झाले. भाचा हेमराज ठाकरे, व आई येडबाई रूपचंद अहिरे यांनी काठ्या व हाताबुक्यांनी दोघांना बेदम मारहाण केली. त्यात नितीन व त्याचे वडील रतिलाल हे गंभीर जखमी झाले.

हे ही वाचा-VIDEO: मुंबईत होर्डिंग लावण्यावरून शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत जोरदार राडा

घटनेनंतर दोघांना सोनगीर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान रतिलाल अहिरे यांचा मृत्यू झाला. दरम्यान सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व 8 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  याप्रकरणी मयताच्या आई, दोघां बहिणींसह आठ जणांवर सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर भगवान ठाकरे याने लोखंडी रॉडने नितीनसह त्याच्या वडील रतिलाल यांना मारहाण केली. तर आत्या मंगलबाई भगवान ठाकरे, सरलाबाई संजय सावळे व संजय गोकुळ सावळे, दीपक संजय सावळे, ज्ञानेश्वर संजय सावळे, हेमराज भगवान ठाकरे, आई येडबाई रूपचंद अहिरे यांना अटक करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime news, Dhule, Murder