मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: मुंबईत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत राडा; आपआपसात भिडले कार्यकर्ते

VIDEO: मुंबईत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत राडा; आपआपसात भिडले कार्यकर्ते

BJP-Shiv Sena activist clash in Mumbai: मुंबईत इंधनदरवाढीवरुन लावण्यात आलेल्या होर्डिंगवरुन शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत वाद झाला आहे.

मुंबई, 29 मे: गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दरवाढ (Fuel price hike) सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर येथे पेट्रोलच्या दराने तर शंभरी गाठली आहे. या इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरुन मुंबईत (Mumbai) शिवसेनेने (Shiv Sena) भाजप कार्यालयासमोर (BJP Mumbai office) निषेध करणारे होर्डिंग लावले. या होर्डिंगवरून शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची (Clash among shiv ena bjp activist) झाली आहे. इतकेच नाही तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं सुद्धा पहायला मिळालं.

मुंबईत आज पेट्रोलसाठी प्रति लिटर 100 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे महागाई सुद्धा वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे. याचाच निषेध करण्यासाठी शिवसेनेने थेट भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयासमोरच निषेध करणारे होर्डिंग लावले आहे. या होर्डिंगवर #मोदी मतलब महंगाई अशा आशयाचे वाक्य लिहिण्यात आलं आहे.

दक्षिण मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी मोदींचा फोटो असलेला होर्डिंग लावला आहे. या होर्डिंगवर म्हटलं आहे, हौस फिटली एकदाची बाबा परत तुझ्या नादी नाही लागणार! एक #देशप्रेमी अब की बार लांबून नमस्कार.

शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांत झालेल्या या बाचाबाची नंतर तात्काळ पोलिसांनी मध्यस्थी केली. यानंतर हे होर्डिंग आता हटवण्यात आलं आहे. तणावपूर्ण झालेले हे वातावरण आता निवळलं आहे.

First published:

Tags: BJP, Mumbai, Petrol, Shiv sena