• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • नोकरीच्या नावाखाली घरात सुरू होता देह व्यापार; तरुणींनी सांगितला भयावह अनुभव

नोकरीच्या नावाखाली घरात सुरू होता देह व्यापार; तरुणींनी सांगितला भयावह अनुभव

परिसरात राहणाऱ्यांनी पोलिसांना सेक्स रॅकेटबद्दल माहिती दिली होती.

 • Share this:
  मुरादाबाद, 24 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुरादाबादमधून एक धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. येथे भाड्याने घर घेऊ सेक्स रॅकेट (Sex Racket) सुरू होतं. रॅकेट चालविणारी व्यक्ती ही नोकरीच्या नावावर तरुणींची फसवणूक करीत होती. हे आरोपी तरुणींना नोकरीच्या नावावर बोलावायचे आणि त्यांना या रॅकेटचा भाग बनवायचे. पोलिसांनी या प्रकरणात 5 जणांना अटक केली आहे. (The sex trade started at home under the name of job Horrible experience told to young women) एएनआयच्या बातमीनुसार, मुरादाबाद जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारींच्या आदेशावर जनपदमध्ये महिला संयुक्त पोलिसांच्या टीमने अनैतिक देह व्यापर करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. ज्यात तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडे असलेल्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय पाचही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं आहे. हे ही वाचा-Facebook Friend ला भेटायला आलेल्या तरुणीचा अश्लील VIDEO केला शूट; 7 लाखही... मुरादाबादच्या पोलिसांना सूचना मिळाली होती की, काही पॉश कॉलनीत भाड्याच्या घरात सेक्स रॅकेट सुरू आहे. सूचना मिळताच पोलिसांची कारवाईची तयारी सुरू केली. या घरात काही संशयित लोकांसह मुलींना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की, या लोकांनी जॉब देण्याच्या नावाखाली येथे बोलावलं आणि त्याच्याकडून देह व्यापार करून घेतला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: