• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Facebook Friend ला भेटायला आलेल्या तरुणीचा अश्लील VIDEO केला शूट; 7 लाख रुपयेही केले वसूल

Facebook Friend ला भेटायला आलेल्या तरुणीचा अश्लील VIDEO केला शूट; 7 लाख रुपयेही केले वसूल

त्यामुळे फेसबुकवर मैत्री करताना तरुणींना अधिक सावध राहणं गरजेचं आहे.

 • Share this:
  नोएडा, 23 ऑक्टोबर : एका तरुणाने फेसबुकवर (Facebook Friend) तरुणीसोबत मैत्री करीत तिला आपल्या प्रेमाच्या (Love) जाळ्यात अडकवलं. यानंतर तिने तरुणीसोबत बलात्कार (Rape on Girl) करीत तिचा अश्लिल व्हिडीओ शूट (Video Shoot) केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) करण्याची धमकी देत तिच्याकडून 7 लाख रुपये वसूल केले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केस दाखल करीत शनिवारी आरोपीला अटक केली आहे. गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका तरुणीने नोएजा पोलिसांना केलेल्या तक्रारीत सांगितलं की, तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तरुणीचं म्हणणं आहे की, काही दिवसांपूर्वी फेसबुकवर तिची मैत्री सागर सिंह नावाच्या तरुणासोबत झाली होती. दोघांमध्ये बातचीत सुरू झाली. आरोपीने लग्नाचं आमिष दाखवित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. तरुणीने आरोप केला आहे की, सागरने 21 ऑक्टोबर रोजी तरुणीला नोएडा सेक्टर-121 मधील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतं. येथे त्याने तरुणीवर बलात्कार केला. सोबतच तरुणीचा अश्लिल व्हिडीओ शूट केला. याशिवाय काही अश्लिल फोटोदेखील घेतले. यानंतर आरोपीने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून 7 लाख रुपये घेत आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. बदनामी होईल या भीतीने तरुणीने पहिल्यांदा कोणाला काहीच सांगितलं नाही. आरोपीने काही दिवसांनी तरुणीना पुन्हा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणीने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हे ही वाचा-लग्नानंतर 8 महिन्यातच घडलं असं काही की इंजिनिअर मेघनाने केली आत्महत्या पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, पैसे उकळणे, ब्लॅकमेल आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी गाजियाबादमधील विजयनगर येथी रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडियावर विविध नावांनी अनेक आयडी तयार केल्या आहेत. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅट करून तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. त्यानंतर त्यांचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटो दाखवून त्यांना ब्लॅकमेल करीत असे. यातून तो लाखो रुपये कमावत होता. अखेर या सागरची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: