मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लाडक्या जावयाचे लाड झाले फार, सासूने काढली थेट पोलीस स्टेशनमध्ये वरात!

लाडक्या जावयाचे लाड झाले फार, सासूने काढली थेट पोलीस स्टेशनमध्ये वरात!

 जावयाचा पाहुणचार करणाऱ्या सासूनेच लाडक्या जावयावर चोरीचा गुन्हा दाखल केल्याची घटना बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात घडली आहे.

जावयाचा पाहुणचार करणाऱ्या सासूनेच लाडक्या जावयावर चोरीचा गुन्हा दाखल केल्याची घटना बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात घडली आहे.

जावयाचा पाहुणचार करणाऱ्या सासूनेच लाडक्या जावयावर चोरीचा गुन्हा दाखल केल्याची घटना बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात घडली आहे.

बीड, 17 फेब्रुवारी : 'नाकीचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान!' या मराठीतल्या म्हणीप्रमाणे जावयाचा पाहुणचार करणाऱ्या सासूनेच लाडक्या जावयावर (son in law) चोरीचा गुन्हा दाखल केल्याची घटना बीड (Beed) जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात (Sirsala Police Station) घडली आहे.  घरात कोणी नसल्याची संधी साधत जावयाने सासुरवडीत चोरी केल्याचा आरोप सासूने केला आहे. या प्रकरणी सासुच्या फिर्यादीवरून जावया विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस कॉलनी  येथे राहणाऱ्या सुनीता बंडूराव कांबळे यांची मुलगी हेमा मागील एक वर्षापासून आईकडे राहत आहे. तिचा पती गोपाळ उत्तम कसबे राहणार वानटाकळी हा नेहमी त्यांच्याकडे येत असतो. EPFO कडून कर्मचाऱ्यांना मिळणार झटका? PF वरील व्याजदरात घट होण्याची शक्यता गोपाळने आधारकार्ड व इतर कागदपत्रे सासूरवाडीत ठेवली होती. बुधवारी सुनीता आणि कुटंबीय नातेवाईकाच्या लग्नासाठी सातेफळला गेले होते. त्यावेळी गोपाळने सासरे खंडूराव कांबळे यांना फोन केला आणि कागदपत्रे मागितली. त्यांनी 'घरी आल्यावर देतो' असे सांगतील. पण गोपाळला आताच कागदपत्र हवी होती. त्यामुळे गोपाळचा पारवारा उरला नाही. संतापलेल्या गोपाळने सासऱ्याचे घरं गाठले आणि कुलुप तोडून पत्र्याच्या पेटीत ठेवलेले त्याचे कागदपत्रे आणि रोख रक्कम 20 हजार रूपये चोरून नेले. घरी परतल्यावर सुनीता कांबळे यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, आता करा इलेक्ट्रिक रिक्षाने प्रवास त्यानंतर सासू सुनीता कांबळे यांनी जावयाला कायमची अद्दल शिकवण्यासाठी थेट सिरसाळा पोलीस स्टेशन गाठले. सुनीता कांबळे यांनी ठाण्यात फिर्याद दिली. त्यामुळे जावई गोपाळ कसबेवर गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.  परंतु, लाडक्य जावयावर गुन्हा दाखल झाल्याच्या घटना गावात चर्चेचा विषय ठरली आहे.
First published:

Tags: Beed, Beed news, Crime, Maharashtra, Mumbai, Robbery, Theft

पुढील बातम्या