भंडारा, 5 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता विदर्भातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर मदत करण्याच्या बहाण्याने सामूहिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
पीडित महिला ही पतिपासुन विभक्त झाली होती आणि गोंदिया जिल्हातील गोरेगाव येथे बहिणीकडे राहत होती. दरम्यान 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. ती भंडारा जिल्ह्यात आईकडे जाणाच्या बहाण्याने निघाली असता प्रथम दर्शनी संशयित आरोपीने तिला घरी सोडण्याचा बहाण्याने कारमध्ये बसवले. यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन 30 जुलैला तिच्यावर अत्याचार केला. तसेच तर दुसऱ्या दिवशी 31 जुलैला देखील पळसगांव जंगलात नेऊन अत्याचार केला. यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.
दरम्यान पीडिता जंगलातून निघुन लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावाजवळ असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली असता तिथे तिची दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी क्रमांक दोन सोबत भेट झाली. तिथे त्यानेही घरी सोडून देण्याच्या बहाण्याने आपल्या मित्रासोबत 1 ऑगस्ट रोजी तिच्यावर अत्याचार केला. तसेच अत्याचारानंतर कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता दरम्यान विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला.
परिसरातील नागरिकांना दिसताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. तसेच महिलेची प्रकृती चिंताजन असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात करीत पुढील उपचारा करिता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात हलविले आहे.
हेही वाचा - संतापजनक! नागपूरमध्ये अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिसांनी दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत. यात संपूर्ण गुन्ह्यात 3 संशयित आरोपींचा समावेश असल्याने 2 आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. तर या पहिला गुन्हा हा गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्याने भंडारा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांना 2 संशयित आरोपीसह गुन्हाचा तपास वर्ग केला आहे. एका अज्ञात फरार आरोपीचा शोध गोंदिया पोलिस घेत आहे. या प्रकारणाचा तपास गोंदिया पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.