Home /News /crime /

एका मागून एक 3 रुग्णालयाने मृत केलं घोषित; पोस्टमार्टमपूर्वी शवगृहात श्वास झाला सुरू

एका मागून एक 3 रुग्णालयाने मृत केलं घोषित; पोस्टमार्टमपूर्वी शवगृहात श्वास झाला सुरू

सकाळी तरुणाला पाहून पोलिसांसह कुटुंबालाही धक्काच बसला...

    लखनऊ, 20 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुरादाबाद जिला रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे (negligence) एका कुटुंबाला मनस्ताप करावा लागला. रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला मृत घोषित करीत शवगृहातील फ्रीजरमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि पोलीस ठाण्यात व्यक्ती मृत झाल्याचा रिपोर्टदेखील पाठवला. (The injured in the road accident were kept in the freezer of the mortuary) शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता कुटुंबीय आणि पोलीस शवगृहात पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की व्यक्तीचा श्वास सुरू होता. यानंतर तातडीने त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. जिल्हा रुग्णालयात जाण्यापूर्वी व्यक्तीला आणखी तीन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र येथे त्यांनी व्यक्तीला मृत घोषित केलं. संभल जनपदमधील हजरत भागातील निवासी श्रीकेश (32) आपल्या कुटुंबासह येथे भाड्याच्या घरात राहतो. त्याचा भाऊ नरेंद्रने पोलिसांना सांगितलं की, श्रीकेश गुरुवारी रात्री साधारण साडे नऊ वाजता डेअरीत दूध खरेदी करायला जात होता. यादरम्यान त्याचा अपघात झाला. दुसऱ्या एका बाईक स्वाराने त्याच्या बाईकला धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर कुटुंबीयांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेलं. येथे रुग्णालयाने तरुणाला दाखल करून घेण्यास नकार दिला. यानंतर कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात पोहोचले. येथे आपात्कालीन विभागात डॉक्टरांनी जखमी तरुणाला मृत घोषित केलं. यानंतर मृतदेह शवगृहात ठेवण्यास सांगितलं आणि पोलिसांना याची सूचनादेखील दिली. हे ही वाचा-अभ्यासासाठी दुसऱ्या मजल्यावर गेली अन्...; बंद खोलीत मुलीचं धक्कादायक कृत्य शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पोलीस आणि कुटुंबीय शवगृहात पोहोचले आणि पंचनामा भरण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलीस व्यक्तीच्या शरीरावरील जखमा तपासत होते. त्यावेळी तरुणाचा श्वास सुरू असल्याची पोलिसांना जाणीव झाली. यानंतर रुग्णालयात खळबळ उडाली. यानंतर जखमी तरुणाला शवगृहातून बाहेर काढलं आणि जिल्हा रुग्णालयातील आपात्कालीन विभागात दाखल केलं. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणात तरुणाच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर तपास सुरू केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Road accident, Uttar pradesh news

    पुढील बातम्या