जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लेकीला सोडायला गेले अन् घरावर पडला दरोडा, तब्बल दीड कोटींचं सोनं लुटलं

लेकीला सोडायला गेले अन् घरावर पडला दरोडा, तब्बल दीड कोटींचं सोनं लुटलं

लेकीला सोडायला गेले अन् घरावर पडला दरोडा, तब्बल दीड कोटींचं सोनं लुटलं

भिवंडी तालुक्यातील मौजे टेंभवली गावात गुरुवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. गावात राहणारे वीटभट्टी उद्योजक दीपक परशुराम बाबरे यांच्या घरी ही घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भिवंडी, 11, डिसेंबर : देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून जवळच असलेल्या भिवंडीमध्ये (Bhiwandi) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होता दिसत आहे. टेंबवली गावात वीजभट्टी उद्योजकाच्या घरावर धाडसी दरोडा टाकण्यात आला असून तब्बल 1.5 कोटी रुपयांचे सोने आणि दागिने लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. भिवंडी  तालुक्यातील मौजे टेंभवली गावात गुरुवारी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. गावात राहणारे वीटभट्टी उद्योजक दीपक परशुराम बाबरे यांच्या घरी ही घटना घडली आहे.  अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचे 3 किलो वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड कपाट फोडून चोरून नेले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. देशभरात डॉक्टरांचा आज संप, कोव्हिड सेंटर सुरू तर ‘या’ सेवा राहणार बंद बाबरे कुटुंबीय घराच्या प्रवेशद्वाराला व घराला कुलूप लावून मुलीला सासरी पनवेल येथे सोडण्यासाठी गेले होते. ते घरी आल्यानंतर गेटच्या व घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. त्यानंतर  घरातील लाकडी कपाट तपासून बघितले असता कपाटाचे कुलूप देखील फोडलेले आढळून आले. त्यामुळे कपाटाची तपासणी केली असता कपाटातील 3 किलो सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. उद्योजक होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मराठी तरुणांसाठी मोठी संधी या दरोड्याच्या घटनेची माहिती तात्काळ तालुका पोलीस ठाण्यास दिली असता वपोनी.राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिराने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात