Home /News /national /

देशभरात डॉक्टरांचा आज संप, कोव्हिड सेंटर सुरू तर 'या' सेवा राहणार बंद

देशभरात डॉक्टरांचा आज संप, कोव्हिड सेंटर सुरू तर 'या' सेवा राहणार बंद

IMA नं पुकारलेल्या या संपात खासगी रुग्णालयं, ओपीडी बंद राहणार आहेत. यावेळी केवळ सरकारी रुग्णालये सुरू राहणार आहेत.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : राजधानी दिल्लीत नव्या कृषी धोरण आणि कायद्यावरून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना आता डॉक्टरांनी देखील आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. विविध मागण्यांसाठी देशभरातून आज डॉक्टर आंदोलन करणार असून देशभरातील काही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना सेंटर आणि कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या सेवा मात्र यावेळी सुरळीत सुरू ठेवण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आज 11 डिसेंबर 2020 रोजी देशभरात बंद पुकारला आहे. आयुर्वेदिक पदव्युत्तर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आयएमएने संप जाहीर केला आहे. देशव्यापी संपादरम्यान ICU आणि CCU सेवा वगळता ज्या अत्यावश्यक सेवा नाहीत त्या सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर घेतलेल्या अपॉईंटमेंट आणि आज होणाऱ्या शस्त्रक्रियादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. हे वाचा-मोठा निर्णय: 'आधार'प्रमाणे मतदान कार्डही होणार डिजिटल IMA नं पुकारलेल्या या संपात खासगी रुग्णालयं, ओपीडी बंद राहणार आहेत. यावेळी केवळ सरकारी रुग्णालये सुरू राहणार आहेत. खासगी रुग्णालयात फक्त आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू राहतील. आयएमएने म्हटले आहे की 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व डॉक्टर संपावर असतील. काही दिवसांपूर्वी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (CCIM) जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले होते की आयुर्वेद डॉक्टर सामान्य आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया सोबतच नेत्र, कान, घसा शस्त्रक्रिया देखील करू शकतील. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या