• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • नवरा-बायकोमधील वादाला भयावह रूप; जीव जाईपर्यंत तरुण करीत राहिला वार

नवरा-बायकोमधील वादाला भयावह रूप; जीव जाईपर्यंत तरुण करीत राहिला वार

असं तर पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असतात. मात्र हा वाद इतक्या टोकाला जाईल असा कोणी विचारही केला नसेल.

 • Share this:
  हरयाणा, 20 नोव्हेंबर : हरयाणामधील (Haryana News) सोनीपत शहरात पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. तारानगरमध्ये राहणारा शत्रुघ्न नावाच्या एका व्यक्तीला स्वत:ची पत्नी पूनमच्या चारित्र्याचा संशय होता. त्या रागात शत्रुघ्नने पत्नीच्या शरीरावर धारदार शस्त्राने 30 हून अधिक वेळा वार केले. यात पत्नीचा मृत्यू झाला. सोनीपत पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि पोस्टमार्टमसाठी सिव्हील रुग्णालयात पाठवलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. बऱ्याच काळापासून सुरू होता वाद... सोनीपतच्या तारानगर येथे राहणारं दाम्पत्य शत्रूघ्न आणि पूनम यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. शत्रुघ्नला पत्नी पूनमच्या चारित्र्यावर संशय़ होता. पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरू असल्याच्या संशयातून दोघांमध्ये सतत वाद होत होता. या संशयातून त्याने पत्नी पूनमच्या शरीरावर धारदार शस्त्राने 30 वेळा वार केले. यामुळे पूनमचा जागेवरच मृत्यू झाला. हे ही वाचा-नवरा तुरुंगात गेल्यानंतर पत्नीने सांभाळला अवैध व्यवसाय; साम्राज्य वाढवलं! या घटनेबद्दल माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पूनमच्या वडिलांनी शत्रुघ्नच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातून देखील पती-पत्नीमधील वादाचा भयावह प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरमधल्या (Muzaffarnagar) ज्ञानमांजरा गावातल्या मदन कुमार नावाच्या 55 वर्षांच्या व्यक्तीनं शुक्रवारी (19 नोव्हेंबर) कौटुंबिक वादातून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. मदन कुमार यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात दाखल करताच तेथील डॉक्टरांनी मदन कुमार यांना मृत घोषित केलं, अशी माहिती चारथवाल पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानं दिली. दुसऱ्या एका घटनेत मुजफ्फरनगरच्या शामली जिल्ह्यातल्या चूसा गावातल्या 23 वर्षाच्या नवविवाहित युवकानं पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून विवाहानंतर अवघ्या 5 दिवसांत विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: