मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दुर्गा पूजेसाठी कलकत्त्याला फिरायला गेलं होतं कुटुंब; घरी परतल्यावर बसला जबर धक्का

दुर्गा पूजेसाठी कलकत्त्याला फिरायला गेलं होतं कुटुंब; घरी परतल्यावर बसला जबर धक्का

घरातील महिला सतत रडत आहे.

घरातील महिला सतत रडत आहे.

घरातील महिला सतत रडत आहे.

धनबाद, 16 ऑक्टोबर : धनबादमधील सरायढेला पोलीस ठाणे हद्दीतील कुसुम बिहारमध्ये (Bihar News) राहणारे संजय सावच्या घरी शुक्रवारी रात्री मोठी चोरीची घटना घडली आहे. चोर 18 लाखांचं सामान घेऊन फरार झाले. यामध्ये 15 लाख दागिने, 3 लाख कॅश सामील आहेत. पीडित कुटुंब दुर्गापूजासाठी कलकत्त्याला फिरायला गेले होते. मात्र जेव्हा शनिवारी ते घरी परते, तेव्हा संपूर्ण घर रिकामं होतं.

चोरांनी कपाट तोडून 15 लाख रुपयांचे दागिने आणि 3 लाख रुपयांच्या कॅशसह घरातील काही सामान घेऊन फरार झाले. घरातील मालकीन लक्ष्मी देवीने मेहनतीने घरातील सर्व वस्तू जमा केल्या होत्या. मात्र चोरांनी एका झटक्यात त्यांच्यावर भयंकर वेळ आणली. धक्कादायक बाब म्हणजे, घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी याचा तपासही केला नाही. (The family had gone to Calcutta for Durga Puja When he returned home they shocked )

हे ही वाचा-चालत्या कारचं स्टेअरिंग लॉक झाल्याने मोठा अपघात, महिला डॉक्टरचा जागीच

नातेवाईक राहुल साव याने पोलिसांच्या कृत्यावर सवाल उपस्थित करीत म्हटलं की, धनबाद पोलीस ड्यूटीवर झोपली होती का? यामुळे शहरात सातत्याने चोरी, दरोड्यासारख्या घटना घडत आहेत. शहरातील सुरक्षेसाठी काम करण्याऐवजी पोलीस बाइक चेंकिगमध्ये व्यग्र असतात. धनबाद पोलिसांनी शहरात दुर्गा पूजा शांततापूर्ण व्हावा यासाठी स्वत:चच कौतुक करीत आहे. मात्र शहरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांच्या कामावर सवाल उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Bihar, Kolkata, Navratri