मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shocking! चालत्या कारचं स्टेअरिंग लॉक झाल्याने मोठा अपघात, महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू

Shocking! चालत्या कारचं स्टेअरिंग लॉक झाल्याने मोठा अपघात, महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू

क महिला आपल्या पतीसह 130 मीटर रोडवरुन जात होती, तेव्हा आय20 कारचं स्टेअरिंग लॉक झालं.

क महिला आपल्या पतीसह 130 मीटर रोडवरुन जात होती, तेव्हा आय20 कारचं स्टेअरिंग लॉक झालं.

क महिला आपल्या पतीसह 130 मीटर रोडवरुन जात होती, तेव्हा आय20 कारचं स्टेअरिंग लॉक झालं.

उत्तर प्रदेश, 16 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) ग्रेटर नोएडातील भागात गुरुवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना (Shocking News) घडली. यामध्ये एका महिला डॉक्टरचा मृत्यू (Doctor Death) झाला आहे. येथे एक महिला आपल्या पतीसह 130 मीटर रोडवरुन जात होती, तेव्हा आय20 कारचं स्टेअरिंग लॉक झालं. आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकली. या घटनेत दोघेही जखमी झाले होते. यानंतर तातडीने पोलिसांनी दोघांना जवळील रुग्णालयात हलवलं. (Big accident due to steering lock of a moving car, female doctor died on the spot)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा वेस्ट स्थित पंचशील ग्रीन्स सोसायटीमधील इंजिनियर शैवाल भटनागर यांची पत्नी शिखा भटनागर एकत्र राहतात. शिखा होमियोपॅथिक डॉक्टर होती. गुरुवारी रात्री उशिरा पती-पत्नी कामानिमित्ताने कारने एकेठिकाणी गेले होते. पती शैवाल गाडी चालवित होता. परतत असताना 130 मीटर रोडवर एच्छर पोलीस ठाण्याजवळ त्यांच्या कारची स्टेअरिंग अचानक लॉक झाली.

गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर कार डिव्हायडरला धडकली. या अपघातात ड्रायव्हरच्या सीटशेजारी पत्नी गंभीर जखमी झाली. पती शैलाव जास्त जखमी झाला नाहीय सीट बेल्ट लावली नसल्याने एअरबॅग उघडली नाही, ज्यामुळे शिखा गंभीर जखमी झाली.

हे ही वाचा-स्वतःच्या सौंदर्याचं कौतुक ऐकून भडकली नवरीबाई; कमेंट करणाऱ्याचीच काढली खरडपट्टी

सर्वात आधी शैलावने 112 वर कॉल केला. हा नंबर लागला नाही म्हणून त्याने आपल्या एका मित्राला फोन केला, त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी दाम्पत्याला जवळील कैलाश रुग्णालयात दाखल केलं. येथे डॉक्टरांनी शिखा भटनागरला हिला मृत घोषित केलं. तर पती शैवाल भटनागर याला प्राथमिक उपचार दिल्यानंतर घरी सोडण्यात आलं. या दाम्पत्याला 6 वर्षांचा मुलगादेखील आहे.

First published:

Tags: Death, Road accident, Uttar pradesh