• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • गुंड गजानन मारणेच्या मिरवणुकीचे चक्क ड्रोन कॅमेऱ्याने शुटिंग, पोलीसही झाले हैराण

गुंड गजानन मारणेच्या मिरवणुकीचे चक्क ड्रोन कॅमेऱ्याने शुटिंग, पोलीसही झाले हैराण

गजानन मारणेचं स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यानंतर एक्स्प्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली.

  • Share this:
पुणे, 16 फेब्रुवारी : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर 300 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणूक काढणाऱ्या कुख्यात गुंड गजानन मारणे (gajanan marne) याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. धक्कादायक म्हणजे, या मिरवणुकीचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. गजानन भारणे यांच्या विरोधात तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मावळ, उर्से टोलनाका भागात दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या गर्दी जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी 15 हजार रुपये किंमतीच्या ड्रोनने सुद्धा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हा ड्रोन जप्त केला आहे. कुख्यात गुंड गजानन मारणेची 2 जणांच्या खून खटल्यातून मुक्तता  झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी सायंकाळी मारणे याचीतळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी 'महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस' टाकत त्यांची एक्स्प्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात 300 हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. गजानन मारणे हा सोमवारी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी कारागृहाबाहेर आला. यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव होता. त्यानंतर त्याच्या सर्व गाड्या एकामागोमाग एक्स्प्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाल्या. विना टोल प्रवेश एरवी टोलनाक्यावरील कर्मचारी एकाही वाहनांना सोडत नाही. मात्र, गजानन मारणे याच्या पुढे मागे शेकडो कार होत्या. त्या सर्व गाड्यांचे दोन्ही नाक्यांवर टोल न भरताच वेगाने पुढे रवाना झाल्या. उर्से टोलनाक्यापर्यंत ही मिरवणूक सुरू होती. त्यानंतर समर्थकांच्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाल्या. कोथरुडमधील पौड रोड येथील घरी रात्री दोन -तीन गाड्यांसह गजानन मारणे घरी पोहोचला. शरद मोहोळ ही बाहेर गेल्या महिन्यात शरद मोहोळ तुरुंगातून बाहेर आला असून इतरही काही गुंड सध्या बाहेर आले आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा टोळीमध्ये वर्चस्वाचा संघर्ष सुरू होतो की काय याविषयी चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातल्या मुख्य गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी एका माजी खासदारांनी पुढाकार घेऊन एकमेकांवरील गुन्हे सोडवण्यासाठी सगळे साक्षीदार फोडले. त्यामुळे सहा महिन्याच्या कालावधीत सगळे प्रमुख म्होरके मोकका तून सुटून बाहेर आले.
Published by:sachin Salve
First published: