जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीने आखला दुसरीच्या हत्येचा कट; मास्कमुळे तिसऱ्याच महिलेचा गेला जीव

डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीने आखला दुसरीच्या हत्येचा कट; मास्कमुळे तिसऱ्याच महिलेचा गेला जीव

डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीने आखला दुसरीच्या हत्येचा कट; मास्कमुळे तिसऱ्याच महिलेचा गेला जीव

या प्रकरणात डॉक्टरांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सीतामडी, 30 ऑगस्ट : सीतामढीमध्ये शासकीय परिसरासमोर डॉक्टरांच्या खासगी क्लिनिकमध्ये गोळीबार झाल्याच्या घटनेत त्यांची पहिली पत्नी सीमा सिन्हा यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांच्या दुसऱ्या पत्नीला रस्त्यातून हटविण्याचा त्यांच्या पहिल्या पत्नीने प्लान आखला होता. मात्र डॉक्टरांच्या दुसऱ्या पत्नीने मास्क (Mask) लावल्याने तिला ओळखता आलं नाही. आणि या प्लानमध्ये तिसरीच महिला अडकली व तिचा जीव गेला. याचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितलं की, तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. (The doctors first wife plotted to kill his second wife) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या पतीला मिळविण्यासाठी त्याच्या दुसऱ्या पत्नीला रस्त्यातून हटविण्याचं कारस्थान रचलं. डॉक्टर शिव शंकर महतो आपल्या खासगी कारमधून नर्स बबलीसह क्लिनिकमध्ये पोहोचले होते. तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यावेळी डॉक्टरांसोबत दोन महिला नर्स होत्या. दोघांनीही मास्क लावला होता. यामुळे डॉक्टरांची दुसरी पत्नी ओळखणं कठीण झालं. दरम्यान हल्लेखोरांनी जिचा याच्याशी काहीही संबंध नाही, अशी तिसऱ्याच महिला नर्सवर गोळी चालवली. यात तिचा मृत्यू झाला. हे ही वाचा- प्रियकराच्या वागणुकीला वैतागून घरात लावला CCTV;1 तासाच्या आत भयावह Video रेकॉर्ड डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीने 6 लाख रुपये देऊन दिली हत्येची सुपारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार झाला त्यावेळी डॉक्टरांनी स्वत:जवळील पिस्तुल बाहेर काढली व गोळीबार करू लागले. यावेळी हल्लेखोरांनी डॉक्टरांवरही गोळी चालवली. डॉक्टर महतो यांनी पहिली पत्नी सीमासोबत राहत नव्हते. त्यांचे शबनम नावाच्या महिलेसोबत अवैध संबंध होते. तिला पत्नीचा दर्जा देऊन ते दोघे एकत्र राहत होते. यामुळे डॉक्टरांच्या पहिल्या पत्नीने दुसरी पत्नी शबनमला मारण्याचं कारस्थान रचलं. आणि 6 लाखांची सुपारी देऊन मारण्याचा कट आखला. मास्क लावल्यामुळे शबनमची ओळख पटवणं झालं अवघड पोलिसांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं की, सध्या डॉक्टरांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोरांना शबनमचा फोटो दाखविण्यात आला होता, मात्र मास्क लावल्यामुळे त्यांना दोन्ही नर्समधून ओळख पटवता आली नाही. या प्रकरणात पहिली पत्नी सीमासह तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात