Home /News /crime /

प्रियकराच्या वागणुकीला वैतागून घरात लावला CCTV; एका तासाच्या आता भयावह व्हिडीओ झाला रेकॉर्ड

प्रियकराच्या वागणुकीला वैतागून घरात लावला CCTV; एका तासाच्या आता भयावह व्हिडीओ झाला रेकॉर्ड

तिने कधी विचारही केला नसेल की या सीसीटीव्हीमध्ये असं काही दृश्य कैद होईल.

    कॅलिफोर्निया, 30 ऑगस्ट : कॅलिफोर्नियामधील (California) हंटिंगटन भागात राहणारी 50 वर्षीय Marylou Sarkissian एक फार्मास्युटिकल एजेंट होती.  Marylou चं बीचर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. बीचर गांज्याची शेती आणि विक्रीचं काम करीत होता. मात्र बीचरला नेहमीच पैशांची गरज भासत असे. आर्थिक कारणामुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा वाढू लागला होता. धोका लक्षात घेत Marylou ने घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. तिने कधी विचारही केला नसेल की या सीसीटीव्हीमध्ये असं काही दृश्य कैदव होईल. (Considering the danger from her boyfriend she installed a CCTV in the house Shocking video recorded) ऑगस्ट 2016 मध्ये मॅरीलूने बीचर विरोघात पहिल्यांदा तक्रार दाखल केली होती. यानंतर 28 ऑगस्ट रोजी तिने 911 वर कॉल करून पोलिसांत तक्रार केली. बीचरने तिच्यासोबत मारहाण केल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. पैशांसाठी बीचर तिला नेहमी मारहाण करीत. धोका लक्षात घेऊन मॅरीयूने 1 डिसेंबर रोजी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. Mirror च्या बातमीनुसार, त्या रात्री मॅरीयू आपल्या कुत्र्यासह घरीच होती. बीचर घराच्या बाहेरच लपून बसल्याचं तिला माहित नव्हतं. बीचर घरात घुसरण्याची संधी शोधत होता. मॅरीयूने साधारण रात्री12.15 वाजता आपल्या कुत्र्याला स्लायडिंगच्या दरवाज्याने बाहेर काढलं. यावेळी बीचरला घरात जाण्याची संधी मिळाली. घरात शिरताच त्याने मॅरीलूवर जोरदार हल्ला केला. यात तिच्या नाकाचं हाड तुटलं. यानंतर त्याने मॅरीलूची गळा दाबून हत्या (Murder) केली. सीसीटीव्ही लावल्याच्या अवघ्या एका तासात हा सर्व प्रकार घडला. हे ही वाचा-बायकोच्या त्रासापासून हवी होती सुटका, पोलीस स्टेशनला आग लावून गेला तुरुंगात हत्येनंतर बीचरवर काहीच परिणाम झाला नव्हता. हत्येच्या 30 मिनिटांनंतर बीचर घराबाहेर पडला. पोलिसांना घरात रक्ताने माखलेली एक बॅग सापडली. बीचर पोलिसांपासून वाचण्यासाठी आपल्या एका नातेवाईकांकडून निघून गेला होता. शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयानेही या प्रकरणात बीचरला दोषी मानून शिक्षा सुनावली आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Boyfriend, Crime news, Murder, United States of America

    पुढील बातम्या