Home /News /mumbai /

संजय राऊत यांच्या पत्नी आज ईडी कार्यालयात जाणार? सेनेकडून अद्याप रेड सिग्नल

संजय राऊत यांच्या पत्नी आज ईडी कार्यालयात जाणार? सेनेकडून अद्याप रेड सिग्नल

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षी राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्याची माहिती ईडीच्या दिल्लीतील सूत्रांनी दिली.

    मुंबई, 29 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena mla sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (varsha raut) यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली आहे. आज वर्षा राऊत यांना चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. पण, त्या चौकशीला जाणार की नाही, याबद्दल अद्याप शिवसेनेनं कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षी राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्याची माहिती ईडीच्या दिल्लीतील सूत्रांनी दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापू लागले. सोमवारीच  संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीने गेल्या दीड महिन्यात काही कागदपत्रांची विचारणा केली होती. त्यांची पुर्तताही आपण केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदे सांगितले. पण आज वर्षा राऊत यांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलंयय त्यामुळे त्या आजच चौकशीला जाणार का.? या सदर्भात अजूनही संभ्रम अवस्थाच आहे. वर्षा राऊत या चौकशीला जाणार की नाही याचा निर्णय शिवसेना ठरवेल. असं उत्तर संजय राऊत यांनी पत्रकार परीषदेत दिले होते. त्यामुळे आज काय घडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. 'त्या' व्यवहाराबद्दल राऊतांचा खुलासा दरम्यान, संजय राऊत यांनी ईडीच्या नोटिसीबद्दल पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. ईडीची नोटीस ही दीड महिन्यांपूर्वी आली होती, अशी कबुलीही राऊत यांनी दिली. 'माझी पत्नी वर्षा राऊत हिच्या नावावर 10 वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मध्यमवर्गीय घराती मराठी शिक्षिका असलेल्या वर्षाने घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे.  भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पडत नाही म्हणून ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे' असा खुलासाही राऊत यांनी केला. 'जर पैशांच्या व्यवहारांची चौकशीच केली जात असेल तर भाजपचे अकाऊंट उघडा, गेल्या 3 वर्षांमध्ये  किती कोटींच्या देणग्या दिल्या आहे, त्याचा हिशेब भाजपच्या नेत्यांनी करावा, माझ्याकडे 20 कोटींचा हिशेब आता माझ्याकडे आहे.  त्यासंदर्भातील माहिती सचिन सावंत यांनी ट्वीट सुद्धा केली आहे, भाजपच्या एका खासदाराचा एका बांधकामात सहभाग आहे, मग त्यांना नोटीस का नाही पाठवली?' असा सवालही राऊत यांनी विचारला. काय आहे प्रकरण? PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती.  गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण आता ईडकडे गेलं. वाधवा बंधू यांच्या चौकशीतून प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आले होते.  प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.  प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमधून वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच  हे पैसे का घेतले गेले? याची माहिती ईडीला हवी आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. त्यामुळे या 55 लाखांच्या माहितीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेबरला चौकशीसाठी बोलावले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या