रस्ते कामात तयार झालेल्या खड्ड्यात कार उलटली; 4 शिक्षकांचा दुर्देवी मृत्यू

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे तयार झालेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने लोणार येथील 4 शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे तयार झालेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने लोणार येथील 4 शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

  • Share this:
    लोणार, 14 जून : विदर्भ मराठवाड्याच्या बॉर्डरवर बुलडाणा-हिंगोली जिल्ह्याला जोडणाऱ्या सेनगावजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेल्या खड्यात कार कोसळल्याने 4 शिक्षकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. लोणार येथील 4 शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. यामध्ये लोणार तालुक्यातील अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले असून अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. चौघेही शिक्षक असून ते मुख्यालयी जाण्यासाठी निघाले होते. सेनगाव ते येलदरी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्त्याच्या बाजूलाच मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यात रविवारी मध्यरात्री ही कार पडली. खड्ड्यातील पाण्यामध्ये कार उलटी झाल्याने पूर्णपणे लॉक झाली. त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही अन् त्यातच गुदमरुन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. हे ही वाचा-फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीवर काळाचा घाला; वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू आधीच कोरोनामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात अपघाती मृत्यूमुळे या शिक्षकांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: