औरंगाबाद, 14 जून: फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबीयांवर रविवारी काळाने घाला घातला आहे. फुगे विकून (After selling balloons) घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने धडक (Accident) दिल्याने बापलेकीचा मृत्यू (Father and daughter death) झाला आहे. फुगे विकून झाल्यानंतर वडील, मुलगी आणि मुलीचा मामा असे तिघेजण दुचाकीवरून खुलताबादवरून औरंगाबादच्या दिशेने येत होते. दरम्यान दौलताबाद घाटात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात टक्कर मारली आहे. या दुर्दैवी घटनेतं तिघंही लांब फेकले गेले. या अपघातात 23 वर्षीय मोनिका गणेश रेनवाला जागीच मृत्यू झाला आहे.
तर मुलीचे वडील ज्ञानेश्वर दामोदर परदेशी (वय-40) आणि मोनिकाचे मामा बद्री साईदास जाधव (वय-45) हे दोघंही गंभीररित्या जखमी झाले. मोनिकाचे वडील ज्ञानेश्वर यांचा रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अवघ्या काही तासांत बापलेकीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या मामा बद्री यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत मोनिका आपला पती आणि मुलीसह जाधववाडी येथे वास्तव्यला होती. तिचे वडील ज्ञानेश्वर देखील मागील काही दिवसांपासून जाधववाडीतच राहत होते. फुगे विकून सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. अशा या गरीब कुटुंबावर रविवारी काळाने घाला घातला आहे. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास खुलताबादहून औरंगाबादकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला आहे.
हे ही वाचा-वीज कडाडल्याने चुकला काळजाचा ठोका; औरंगाबादमध्ये चिमुकलीचा दुर्दैवी अंत
हा अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने जखमींना घटनास्थळी टाकून पोबारा केला. यानंतर स्थानिकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन केला. पण रुग्णवाहिकेला घटनास्थळी येण्यास सधारणतः 50 मिनिटे उशीर झाला. तोपर्यंत जखमीचं बरंच रक्त वाया गेलं. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमींना त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी वडील ज्ञानेश्वर यांनी अखेरचा श्वास घेतला. तर मामा बद्री यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news, Road accident