• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Virar : पाण्याच्या ड्रममध्ये कोंबला तरुणाचा मृतदेह; दुर्गंधी पसरल्याने भयावह प्रकार उघड

Virar : पाण्याच्या ड्रममध्ये कोंबला तरुणाचा मृतदेह; दुर्गंधी पसरल्याने भयावह प्रकार उघड

एका 30 ते 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्याच्या छोट्याशा ड्रममध्ये कोंबून भरला होता आणि हा ड्रम रस्त्याशेजारी फेकून देण्यात आला होता.

 • Share this:
  विरार, 25 नोव्हेंबर : विरारच्या (Virar News) मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील उसगाव येथे रस्त्याकडेला एका 30 ते 35 वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा हत्या (Murder) केलेला मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये फेकून दिलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने ही घटना (Crime News) उघडकीस आली. (the body of a young man in a water drum reveals a frightening type) नागरिकांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपासणी केली असता सदर मृतदेह कपड्याने गुंडाळलेल्या अवस्थेत ड्रममध्ये टाकून रस्त्याकडेला फेकल्याचे दिसून आले. सदर व्यक्तीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त होत असून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने रात्रीच्या अंधारात रस्त्याकडेला फेकला. हे ही वाचा-दुर्दैवी! बापाच्या कारखाली चिरडून लेकाचा अंत; हृदय पिळवटून टाकणारा Live video पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवून दिला आहे. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने विरार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: