सिंगरोली, 28 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिंगरोली (Singrauli) मधून एक अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील एका 64 वर्षांच्या वयस्कर व्यक्तीने कथित रुपात आपल्या पत्नीचा प्रायव्हेट पार्ट (Man Stitched Wife’s Private Part) शिवल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही बातमी समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. महिला आज स्वावलंबी झाल्या आहेत, मात्र तरीही त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहे. आता तर हद्दच झाली. वैवाहिक जीवनात महिलेला या ना त्या प्रकारचे अत्याचार सहन करावे लागतात. काही जणी तर यातून आत्महत्येसारखं पाऊल उचलतात. आता तर आपल्याच देशातील एका व्यक्तीने पत्नीचा प्रायव्हेट पार्ट शिवल्याचं वृत्त मन सुन्न करणारं आहे. असा वाचला महिलेचा जीव टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अनिल सोनकरने सांगितलं की, या घटनेनंतर पीडित महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा तिला रुग्णालयात आणलं तेव्हा तिची हालत अत्यंत गंभीर होती. वेळेवर तिला रुग्णालयात आणल्यामुळे महिलेचा जीव वाचला. हे ही वाचा- पतीचा क्रूरतेचा कळस; पत्नीच्या गुप्तांगात बिअरची बाटली टाकत दिले सिगरेटचे चटके आरोपीविरोधात केस दाखल पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पीडित महिलेचं वय 55 वर्षे आहे. तिने पोलिसातील एका महिला अधिकाऱ्याशी संपर्क केल्यानंतर ठाण्यात तक्रार दाखल केली. हा अत्यंत क्रूर, घृणास्पद गुन्हा आहे. पुढे पोलीस म्हणाले की, आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही पीडितेने पतीविरोधात कडक कारवाई करू नका, अशी मागणी केली आहे. आरोपीचा तपास सुरू.. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महिलेने विनंती केली आहे की, तिच्या पतीविरोधात कडक कारवाई केली जाऊ नये. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाला. पीडित महिलेला चार मुलं आणि नातवंडही आहे. वडिलांनी केलेल्या या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.