पाटणा 28 ऑगस्ट : हुंडा (Dowry) वगैरे वाईट प्रथा-परंपरा आताच्या काळात नामशेष झाल्या आहेत, असं म्हटलं जातं. वास्तव मात्र वेगळंच आहे. अनेक विवाहित स्त्रियांना हुंड्यासाठी सासरी छळ सोसावा (Harassment for Dowry) लागतो. काही वेळा या प्रकरणामुळे माहेरी कोणाला त्रास होऊ नये, म्हणून स्त्रिया स्वतःच त्रास सोसत राहतात. हा त्रास मारहाणीपासून मानसिक छळापर्यंत बऱ्याच प्रकारचा असू शकतो. बिहारच्या (Bihar) मुझफ्फरपूर जिल्ह्यात करजा नावाच्या एका गावात हुंड्यासाठी घडलेली घटना मात्र खूपच दुर्दैवी आणि मानवी कल्पनाशक्तीच्या बाहेरची आहे. हुंडा म्हणून पाच लाख रुपये न मिळाल्यामुळे पतीने आपल्या पत्नीच्या गुप्तांगाला सिगारेटने (Cigarette) चटके दिले. एवढ्यावरही त्याचं समाधान झालं नाही, म्हणून त्याने बीअरची बाटली (Beer Bottle) तिच्या गुप्तांगात घुसवण्याचा प्रयत्न केला.
पीडित महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी मो. इश्तेयाक याच्याशी झाला. या दाम्पत्याला चार वर्षांचा मुलगाही आहे. नव्याचे नऊ दिवस म्हणतात, त्याप्रमाणे लग्नानंतर पहिले काही दिवस सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. नंतर मात्र पीडितेचे पती, सासू-सासरे आणि दीर तिच्याकडून हुंडा म्हणून बाइक आणि पाच लाख रुपयांची मागणी करू लागले. हे ऐकून तिला धक्का बसला; पण काही तरी मार्ग निघेल असं तिला वाटत होतं. मात्र हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे पती आणि दीराने चक्क तिला मारहाण केली. हे झाल्यानंतर तिला आपण भयानक परिस्थितीत अडकल्याची जाणीव झाली. 'लोकमतन्यूज डॉट इन'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
...म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना
पतीची क्रूरता (Cruelty of Husband) वाढतच चालली. त्याने तिच्या गुप्तांगाला सिगारटेचे चटके दिले. इतक्या हीन पातळीला जाऊनही त्याचं समाधान झालं नाही, म्हणून त्याने बीअरची बाटली तिच्या गुप्तांगात घुसवण्याचा प्रयत्न केला. तिची अल्पवयीन बहीण तिला वाचवायला आली, तेव्हा पती, सासरे आणि दीराने तिच्याशी गैरवर्तन केलं. पीडिता या सगळ्या प्रकारादरम्यान प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास भोगत होती. मात्र तिची सासरकडच्या कोणालाही दया आली नाही आणि कोणाचंही मनपरिवर्तन झालं नाही. त्यांनी आपली हुंड्याची मागणी कायम ठेवली.
ठाण्यातील महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी अत्याचाराची कहाणी सांगणारा VIDEO
अखेर सहनशक्तीचा अंत झाल्यानंतर पीडितेने तक्रार दाखल करायचं ठरवलं. तिने आपल्यावर झालेल्या सगळ्या अत्याचारांविषयी तक्रार दाखल केलीच. शिवाय, आपल्या अल्पवयीन बहिणीची सासरे, पती आणि दीराने छेड काढल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या संदर्भात पीडितेने विशेष पॉक्सो कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीदरम्यान विशेष पॉक्सो कोर्टाचे न्यायाधीश दीपक कुमार यांनी कारजा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना एफआयआर दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Sexual harrasment