Home /News /crime /

25 वर्षांची तरुणी दिसू लागली पन्नाशीची; लग्नाच्या 4 वर्षात सासरच्यांनी सुनेची अशी केली अवस्था

25 वर्षांची तरुणी दिसू लागली पन्नाशीची; लग्नाच्या 4 वर्षात सासरच्यांनी सुनेची अशी केली अवस्था

या चार वर्षांत सासरच्या मंडळींनी सुनेची भयावह अवस्था केली आहे.

    इंदूर, 13 डिसेंबर : ग्वाल्हेरमध्ये (Madhya Pradesh) एका 25 वर्षीय तरुणीला तिच्या सासरच्या मंडळींनी चार वर्षांपर्यंत बंदिस्त घरात ठेवलं होतं. या चार वर्षात तिला पोट भरून जेवायलाही दिलं नाही. इतक्या अत्याचारानंतर आता तरुणी आजारी पडली आहे. ती आपल्या वयाच्या दुप्पट वयाची दिसतेय. तरुणीचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं आहे. याशिवाय सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (women harassment) ग्वाल्हेरमध्ये चार वर्षांपासून घरात बंदिस्त तरुणीची अत्यंत दु:खदायक कहाणी समोर आली आहे. या महिलेला तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी चार वर्षांपर्यंत एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. (The 25 year old girl appeared to be in her fifties In 4 years of marriage daughter in laws terrible condition) सांगितलं जात आहे की, या तरुणी घरातील काम करण्यासाठीच बाहेर काढलं जात होतं. त्यानंतर पुन्हा तिला खोलीत बंद केलं जात होतं. जेवायलाही कधी पोटभर दिलं नाही. चार वर्षांपर्यंत तरुणी या एका खोलीत राहत आहे. पुरेसं अन्न न मिळाल्याने ती खंगून गेली आहे. यादरम्यान तिला टीबीची लागण झाली. सध्या तरुणी अवघी 25 वर्षांची आहे. मात्र ती वयापेक्षाही दुप्पट दिसतेय. लग्नापासून पतीने तिच्यावर खूप अत्याचार केले आहे. आता मात्र तिने या अत्याचाराविरोधात लढण्याचं ठरवलं आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पती आणि सासरच्या मंडळींविरोधात मारहाण, हुंड्यासाठी त्रास देणे आदी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्तानने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पीडितेने तिला चार वर्षे एकाच खोली का ठेवलं याबद्दल विचारलं असता पीडितेने सांगितलं की, आजूबाजूच्या लोकांना याबाबत कळू नये म्हणून तो तिला एका खोलीत बंद करून ठेवत होता. शेजारच्यांकडून तिच्या माहेरी कोणालाही काही कळू नये हा सासरच्या मंडळींचा प्लान होता. चार वर्षांपूर्वी झालं होतं लग्न... 25 वर्षीय सोनिया हिचं लग्न 14 जानेवारी 2018 रोजी झालं होतं. लग्नानंतरही सोनियाच्या आईने तिला एक बाईक दिली होती. मात्र पतीने हुंड्यात दिलेली बाईक विकली. त्यानंतर तो सोनियाच्या माहेरच्यांकडून दुसऱ्या गाडीची मागणी करू लागला. विरोध केल्यानंतर तिला मारहाणदेखील करीत होता. सोनियाला त्यांनी घरकाम करणाऱ्या बाईपेक्षाही वाईट वागणूक दिली. तिला एका खोलीत बंद करून ठेवलं. सकाळी तिच्याकडून घरातील सर्व काम करून घेत होते. यानंतर पुन्हा तिला एका खोलीत बंद करून ठेवलं जात होतं. सायंकाळी तो पुन्हा तिला खोलीबाहेर काढत असे आणि घरातील सर्व काम झाल्यानंतर पुन्हा खोलीत बंद करीत होता. गेल्या चार वर्षांपासून हेच सुरू होतं आणि तरुणी हे सर्व सहन करीत होती. हे ही वाचा-रात्री शरीर संबंधादरम्यान संतापली पत्नी; पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार सोनियावर दिवसेंदिवस अत्याचार वाढत होते. दरम्यान तिला टीबीची लागण झाली. यानंतरही तिला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पती तिला तांत्रिक बाबाकडे घेऊन जात होता. यात तिची तब्येत अधिक बिघडली. आता तर ती टीबीच्या शेवटच्या स्टेजवर पोहोचली आहे. 25 वर्षांची सोनिया आता 50 शीची दिसत आहे. एकेदिवशी तिची आई घरी पोहोचली तर पती नसताना तिला खोलीबाहेर काढलं. आणि यानंतर सर्व प्रकार पोलिसात जाऊन सांगितला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Indore, Women harasment

    पुढील बातम्या