मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रात्री शरीर संबंधादरम्यान संतापली पत्नी; पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने केले वार

रात्री शरीर संबंधादरम्यान संतापली पत्नी; पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने केले वार

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

लॉकडाऊनमध्ये तरुणाचं लग्न झालं होतं. या हल्ल्यात त्याला खूप जास्त रक्तस्त्राव झाला असून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

इंदूर, 13 डिसेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) टिकमगड जिल्ह्यातून एक विचित्र प्रकार समोर आलं आहे. पती-पत्नी (Husband and Wife) शरीर संबंध ठेवत असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादात पत्नीने रागाच्या भरात पत्नीला रक्तबंबाळ केलं. सध्या पतीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

त्याच्यावर झासी येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वीच तरुणाचं लग्न झालं होतं. पत्नीने रागाच्या भरात त्याच्या प्रायव्हेट पार्टवर  (Attack On Private Part) ब्लेडने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या बाबत पोलिसांनाही सांगण्यात आलं असून तेदेखील या प्रकरणात चौकशी करीत आहे. (Wife angry during Physical relationship at night The blade attack on husbands private part)

तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या लग्नाला अद्याप तीन वर्षेही पूर्ण झालेली नाही. रात्रीच्या वेळी शरीर संबंध ठेवत असताना पत्नीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केले. यामुळे अख्खं अंथरून रक्ताने माखलं. तरुणाला खूप जास्त रक्तस्त्राव झाल्याचं सांगितलं जात आहे. प्राथमिक उपचार देऊन त्याला झांसी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या प्रकरणात तरुणाने रविवारी पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार केली आहे.

हे ही वाचा-पैशांची वाट पाहत राहिलं रुग्णालय; डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू

पत्नी अद्याप आपल्या सासरीच आहे. अद्याप एफआयआर दाखल केलेली नाही. मात्र ही केस गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यावर पतीने सांगितलं की, पत्नीने असं का केलं याबद्दल काहीच माहिती नाही. 2019 मध्ये त्यांचं लग्न झालं. सुरुवातीला दोघांमध्ये खूप वाद होत होता. नंतर मात्र ठीक असल्याचं तरुणाने सांगितलं.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, PRIVATE part