Home /News /crime /

पत्नीसोबत वाद, संतापलेल्या पित्याचं क्रूर कृत्य, पण सात वर्षाच्या चिमुकलीचा काय दोष?

पत्नीसोबत वाद, संतापलेल्या पित्याचं क्रूर कृत्य, पण सात वर्षाच्या चिमुकलीचा काय दोष?

आरोपी पिता

आरोपी पिता

एका पित्याने आपल्या पोटच्याच लेकीची गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे, या हत्येमागे खूप क्षुल्लक कारण होतं. विशेष म्हणजे त्यामध्ये सात वर्षाच्या चिमुकलीचा काहीच दोष नव्हता. पण तरीही त्याने आपल्या लेकीला संपवण्याचं क्रूर कृत्य केलं.

पुढे वाचा ...
  निखिल चव्हाण, प्रतिनिधी ठाणे, 6 डिसेंबर : ठाण्यातून (Thane) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जुगारी बापाने आपल्या पोटच्या लेकीचा गळा दाबून हत्या (Father Killed Daughter) करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या निर्घृण कृत्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणातून (clash with wife) त्याने हे कृत्य केल्याचा दावा केला आहे. पण एक बाप आपल्या पोटच्या लेकीसोबत इतकं वाईट कसं वागू शकतो? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडत आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी बापाने विष पिवून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  नेमकं प्रकरण काय?

  संबंधित घटना ही मुंब्र्यात घडली आहे. आरोपीचं नाव अनिस असं आहे. तो आपली पत्नी शोफिया मालदार आणि सात वर्षाची मुलगी मायरा हिच्यासोबत मुंब्र्यात वास्तव्यास होता. अनिस हा काहीच काम करायचा नाही. याशिवाय त्याला जुगाराचं व्यसन होतं. त्यामुळे या मुद्द्यावरुन शोफिया आणि अनिस यांच्यात सारखा वाद व्हायचा. शोफिया स्वतः नोकरी करुन घर चालवत होती. अखेर तिने अनिसच्या जुगाराच्या व्यसनाला कंटाळून लेक मायरासह वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अनिसला मान्य नव्हता. त्यामुळे दोघे पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हेही वाचा : एअरपोर्टवर महिलेनं केलं असं कृत्य की वळून वळून पाहू लागले लोक, झाली अटक

  ...आणि पित्याने पोटच्या लेकीला संपवलं

  शोफियासोबत भांडण झाल्याने अनिसचं डोकं फिरलं होतं. त्याने रागाच्या भरात आपल्या पोटच्या लेकीला संपविण्याचा विचार केला. शोफिया रात्री घरात झोपली असताना अनिसच्या डोक्यातील सैतानी बाप जागी झाला. त्याने आपली निष्पाप सात वर्षीय मुलगी मायराला उचललं. तो तिला घेऊन थेट मुंब्रा बायपास रोडवर दाखल झाला. तिथेच त्याने तिची गळा दाबून हत्या केली. हेही वाचा : महिला आली पोलीस ठाण्यात, तक्रार ऐकून चक्रावले पोलीस; सुरू केले मानसोपचार

  मुलीची हत्या करुन विष प्राशन

  मुलीच्या हत्येनंतर तो शांत झाला. आपण रागाच्या भरात काय करुन बसलो याची जाणीव त्याला झाली. त्याला आपण केलेल्या कृत्याची उपरती झाली. त्याने प्रायश्चित्त म्हणून स्वत: विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने विष पिवून पोलिसांच्या 100 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करुन आपल्या कृत्याची माहिती दिली. मुंब्रा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपी पित्याला जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आरोपी अनिस याच्यावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी दिली आङे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या