मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /थरारक! या गावात पसरलीय ‘खुनी साधू’ची दहशत, उचललाय 9 जणांच्या हत्येचा विडा

थरारक! या गावात पसरलीय ‘खुनी साधू’ची दहशत, उचललाय 9 जणांच्या हत्येचा विडा

गावातील दोघांची निर्घृण हत्या करणाऱ्या आणि इतर 9 जणांच्या (terror in the village after murderer Sadhu threatens to kill 9 villagers) हत्येचा विडा उचललेल्या खुनी साधूची दहशत गावभर पसरली आहे.

गावातील दोघांची निर्घृण हत्या करणाऱ्या आणि इतर 9 जणांच्या (terror in the village after murderer Sadhu threatens to kill 9 villagers) हत्येचा विडा उचललेल्या खुनी साधूची दहशत गावभर पसरली आहे.

गावातील दोघांची निर्घृण हत्या करणाऱ्या आणि इतर 9 जणांच्या (terror in the village after murderer Sadhu threatens to kill 9 villagers) हत्येचा विडा उचललेल्या खुनी साधूची दहशत गावभर पसरली आहे.

पटना, 29 सप्टेंबर : गावातील दोघांची निर्घृण हत्या करणाऱ्या आणि इतर 9 जणांच्या (terror in the village after murderer Sadhu threatens to kill 9 villagers) हत्येचा विडा उचललेल्या खुनी साधूची दहशत गावभर पसरली आहे. फरार आरोपी मोतीलाल यादव (Absconding Sadhu's fear) सध्या पोलिसांना गुंगारा देत असून अचानक गावात हल्ला करण्याची भीती ग्रामस्थांना वाटत असल्यामुळे या गावात रात्रीदेखील जागता पहारा दिला जात आहे.

दांपत्याची केली हत्या

बिहारमधील पश्चिम चंपारणमधील लक्ष्मीपूर गावात मोतीलाल यादवनं काही दिवसांपूर्वी एका पती-पत्नीची हत्या केली होती. याच गावात राहणाऱ्या बेचू यादव यांची पत्नी तारा देवी यांच्यावर मोतीलालचं एकतर्फी प्रेम होतं. त्यांची सतत छेड काढण्याचा प्रयत्न मोतीलाल करत असे. यावरून बेचू यादव यांनी समज दिल्यानंतर चिडलेल्या मोतीलालने त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तारा देवीच्या घरी जाऊन त्यांच्या मुलींदेखत त्याने शरीरसंबंधांची मागणी केली. त्याला नकार दिल्यावर मुलींच्या डोळ्यांदेखत त्यांनी तारादेवींचाही खून केला. त्यानंतर मोतीलाल फरार आहे.

गावात पसरली भीती

या घटनेनंतर एक दिवस गवत तोडायला जाणाऱ्या महिलेकडे त्याने शरीरसंबंधांची मागणी केली. त्याला नकार दिल्यावर महिलेचाही त्याने खून केला. हा साधू गावात येतो आणि आपल्याला आणखी 9 जणांची हत्या करायची असल्याचं ओरडून ओरडून सांगतो. त्यामुळे गावात दहशत पसरली आहे. गावातील सर्वजण दिवस मावळण्यापूर्वीच शेतातून घरी परततात, तर महिलांनी भीतीमुळे शेतात जाणंच थांबवलं आहे.

हे वाचा - बापाने पोटच्या लेकीला आपटून आपटून केलं ठार, आईवडिलांच्या भांडणात लेकीचा बळी

रात्रभर गस्त

या साधूच्या भीतीने गावकऱ्यांनी जागता पहारा सुरू केला आहे. लोक आळीपाळीने काठ्या, त्रिशूळ आणि इतर शस्त्रं घेऊन या साधूपासून गावकऱ्यांचा बचाव करण्यासाठी एकवटले आहेत. पोलिसांनीदेखील साधूचा शोध सुरू केला असला तरी अद्याप तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे. दिवसभर तो शेजारच्या गावांमध्ये उसाच्या शेतात किंवा डोंगरात लपून बसलेला असतो, अशी माहिती ग्रामस्थ देतात. या साधूला लवकरात लवकर अटक व्हावी, अशी अपेक्षा पंचक्रोशीतील सगळे गावकरी करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime, Murder