Home /News /crime /

अल्पवयीन मुलाचा कांड जाणून हादराल; थेट सरकारची फसवणूक करून लुटले 46 कोटी

अल्पवयीन मुलाचा कांड जाणून हादराल; थेट सरकारची फसवणूक करून लुटले 46 कोटी

शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षाच्या मुलाला महामारीच्या काळात चाचणी केंद्रांना देण्यात येणाऱ्या सरकारी निधीबाबत एक भयानक कल्पना सुचली. 2020 मध्ये त्याने केवळ कागदावरच बनावट कोविड चाचणी केंद्र उघडलं होतं.

    नवी दिल्ली 03 जून : कोरोना महामारीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं समोर आली. काही लोक स्वार्थ सोडून दुसऱ्यांना मदत करताना दिसले, तर काही पैसे कमवण्यासाठी या कठीण काळातही लोकांची फसवणूक करताना दिसले. जर्मनीमध्येही असाच एक 17 वर्षीय मुलगा पकडला गेला होता, ज्याने बनावट कोविड चाचणी केंद्राच्या (Fake COVID Test Center) नावावर राज्य निधीतून 46 कोटी रुपयांचा घोटाळा केला (Teenager Scammer). भयंकर! गरीबांच्या किडनीचा लाखांमध्ये व्यवहार; राजधानीतून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश ही घटना 2020-2021 मध्ये जर्मनीत घडली. यावेळी देशात कोरोना महामारी आपलं भीषण रूप दाखवत होती. अशा परिस्थितीत लोकांना अधिकाधिक कोविड चाचण्या करून घेण्यास सांगितलं जात होतं आणि त्यासाठी राज्याच्या निधीतून टेस्ट सेंटर्सना पैसेही दिले जात होते. याचाच फायदा घेत एका विद्यार्थ्याने बनावट कोविड चाचणी केंद्र उघडून थेट सरकारची फसवणूक केली. शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षाच्या मुलाला महामारीच्या काळात चाचणी केंद्रांना देण्यात येणाऱ्या सरकारी निधीबाबत एक भयानक कल्पना सुचली. 2020 मध्ये त्याने केवळ कागदावरच बनावट कोविड चाचणी केंद्र उघडलं होतं. पब्लिक प्रॉसिक्यूटर ऑफिसच्या म्हणण्यानुसार, जर्मनीच्या डॉक्टर्स असोसिएशनने मुलाने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला आणि तो कोविड चाचणी केंद्र चालवत असल्याचं गृहीत धरलं. या मुलाने दररोज 5000 चाचणीचं बिल बनवलं आणि केंद्राच्या नावावर पैसे खाल्ले. त्यावेळी कोरोनाची एवढी भीती होती की, टेस्ट सेंटर्स नीट न पाहता बिल स्वीकारून त्यावर अनुदान दिलं जात होतं. याचा फायदा मुलाने घेतला. गॅस कटरने फोडले एटीएम मशीन, तब्बल साडे 9 लाखांची रक्कम घेऊन चोरटे पसार! या घोटाळेबाज मुलाने 5 लाख चाचण्यांचं बिल बनवलं. आश्चर्य म्हणजे डॉक्टर्स असोसिएशनच्या चौकशीतही तो कधीच पकडला गेला नाही. मात्र एका बँक कर्मचाऱ्याला अचानक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यात इतके पैसे पाहून मनी लाँड्रिंगचा संशय आला. त्याने पोलिसांना माहिती दिली असता तपासादरम्यान मुलाची फसवणूक पकडली गेली. मात्र गुन्हा करते वेळी तो अल्पवयीन होता, त्यामुळे त्याला 1 लाख 20 हजारांचा दंड आणि एक वर्षाच्या प्रोबेशनवर सोडून देण्यात आलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Covid centre, Financial fraud

    पुढील बातम्या