मुंबई 03 ऑक्टोबर : मुंबईतील एका शाळेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात एका शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीत नववीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला. क्लास सुरू असताना गोंधळ केल्याच्या संशयावरुन संस्कृतच्या शिक्षकाने या विद्यार्थ्याला कानशिलात लगावली असता ही घटना घडली. सांताक्रूझ पोलिसांनी शिक्षक कमलेश तिवारी (50) यांच्यावर आयपीसी कलम 325 (गंभीर दुखापत) आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यातील कलम 75 अन्वये एका मुलासोबत क्रूर कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. 30 सप्टेंबर रोजी याबाबत एफआयआर दाखल झालं असून त्यांना अद्याप या प्रकरणात अटक झालेली नाही. सरकारी शाळेत दरवाजा बंद करुन विद्यार्थ्यांना बळजबरीने टोचली लस, 50 मुलांची झाली अशी अवस्था 27 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. संस्कृतचा क्लास घेत असलेल्या तिवारी यांना नीरज यादव (14) वर्गात लक्ष देत नसल्याचा संशय आला. “आम्ही तपशील गोळा करत आहोत आणि जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. चौकशीच्या आधारे शिक्षकावर पुढील कारवाई केली जाईल,” असं सांताक्रूझ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. डॉक्टरांच्या अहवालात नीरजच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याची आई पूनम (३७) यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत पूनमने म्हटलं आहे की “माझ्या मुलाने आपला हात तोंडावर ठेवला होता. यामुळे शिक्षकाने गैरसमजातून त्याला चापट मारली. माझ्या मुलाने सांगितलं की क्लासदरम्यान इतर विद्यार्थी जोरात बोलत होते, ज्यामुळे शिक्षक नाराज झाले होते. त्यांना वाटलं की नीरज तोंडावर हात ठेवून बोलत आहे आणि रागात त्यांनी त्यालाच मारलं.” होमवर्क केला नाही म्हणून 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; शाळेबाहेर आढळला मृतावस्थेत या घटनेनंतर नीरजला वेदना होत असल्याने आणि नीट ऐकू येत नसल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी दोन महिला शिक्षकांना तक्रार त्याला वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेण्यास सांगितलं. “मुख्याध्यापकांनी नीरजच्या आईला घटनेची माहिती दिली आणि ईएनटी तज्ञाचा सल्ला घेण्यास सांगितलं. तपासणीत नीरजच्या कानाचा पडदा फुटल्याचं दिसून आलं” असं पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.