अलीगढ, 1 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशातील अलिगढ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी आरोग्य विभाग आणि शाळा प्रशासनाचा मोठे निष्काळजीपणा समोर आला आहे. शाळेचे गेट बंद केल्यानंतर सरकारी शाळेत शिकणाऱ्या सुमारे 150 मुलांना जबरदस्तीने लस देण्यात आल्याचा प्रकार याठिकाणी घडला. लसीच्या डोसनंतर, 50 हून अधिक मुलांची प्रकृती खालावली. यानंतर त्यांना तातडीने स्थानिक सीएससीमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आमच्या परवानगीशिवाय मुलांना लस का देण्यात आली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या मुलांना मारहाण करत त्यांना बळजबरीने लसीचा डोस देण्यात आला. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली, असे त्यांचे म्हणणे आहे. अलीगढमधील दादों ठाणे भागातील नगला प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी शाळेचे गेट बंद करून 150 विद्यार्थ्यांचे जबरदस्तीने लसीकरण करण्यात आले. त्यानंतर सुमारे 50 मुले अचानक आजारी पडले. त्यांना घाईघाईने छर्रा भागातील सीएससीमध्ये दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी केला हा आरोप - दरम्यान, याप्रकरणी शाळेतील विद्यार्थ्यांनी असा आरोप केला आहे की, शाळेतील शिक्षकांनी मुलांना जबरदस्तीने खोलीत बंद करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना लसीचा डोस देण्यात आला. डोस दिल्यानंतर, बहुतेक मुलांना उलट्या जुलाब आणि तीव्र ताप येऊ लागला, त्यानंतर पालकांनी त्यांच्या मुलांना स्थानिक सीएचसीमध्ये दाखल केले. दुसरीकडे, कुटुंबीयांवर विश्वास ठेवला तर, त्यांनी आरोप केला आहे की शाळा प्रशासनाने मुलांना डोसची माहिती दिली नाही किंवा डॉक्टरांनीही त्यांना याबद्दल काही सांगितले नाही. प्रगतीशील समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम अवतार यादव यांनी सांगितले की, दादो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला येथील सरकारी प्राथमिक शाळेत 150 मुलांना जबरदस्तीने लस देण्यात आली, त्यानंतर त्यांना शाळेतून हाकलण्यात आले. यानंतर मुलांची प्रकृती खालावली, त्यांना तातडीने स्थानिक सीएससीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शाळा प्रशासन आणि आरोग्य विभागाचा हा मोठा निष्काळजीपणा आहे. प्रशासनाने दखल घेऊन या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हेही वाचा - VIDEO: दिवसाढवळ्या घरात घुसून चोरायची लाखोंचे दागिने; मुंबईतील महिलेनं पोलिसांना आणलं नाकीनऊ, शेवटी.. छर्रा सार्वजनिक आरोग्य केंद्रातील अधीक्षक डॉ. अवनेंद्र यादव यांनी सांगितले की, बुस्टर डोस अभियान सुरू आहे. याच अनुषंगाने टीडी आणि डीपीडीचे डोस देण्यात येत आहेत. डीपीडीच्या डोस नंतर जास्त करुन ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना ताप येऊ शकतो, असेही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.