जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अंगात देवी आल्याचं दाखवून तलवारीने छोट्या बहिणीचं शिर धडापासून केलं वेगळं; वडील-काकांवरही हल्ला

अंगात देवी आल्याचं दाखवून तलवारीने छोट्या बहिणीचं शिर धडापासून केलं वेगळं; वडील-काकांवरही हल्ला

अंगात देवी आल्याचं दाखवून तलवारीने छोट्या बहिणीचं शिर धडापासून केलं वेगळं; वडील-काकांवरही हल्ला

मुलगी इतक्यावरच थांबली नाही तर तिने तलवारीने आपले वडील आणि काकांवरही हल्ला केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर, 1 ऑगस्ट : राजस्थानमधून आस्थाच्या नावाखाली अंधविश्वासाची भयंकर घटना समोर आली आहे. येथे एका मुलीने आपल्या 7 वर्षांच्या चुलत बहिणीची हत्या केली. अंगात देवी आल्याचं म्हणत मुलीने गावात खूप गोंधळ घातला. यानंतर ती घरातील सदस्यांवर हल्ला करू लागली. या हल्ल्यात तिचे वडील आणि काकादेखील जखमी झाले आहेत. हे प्रकरण डुंगरपूर जिल्ह्यातील चितरी पोलीस ठाणे हद्दीतील आहे. अंधविश्वासातून एका मुलीने अंगात देवी येत असल्याचं दाखवून आपल्या 7 वर्षीय चुलत बहिणीच्या गळ्यावर तलवारीने वार केले. यात तिची हत्या झाली. यानंतर मुलीने आपले वडील आणि काकांवरही हल्ला करीत त्यांना जखमी केलं. पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दशा माता व्रत पर्वदरम्यान अंगात देवी आल्याचं दाखवित एका 15 वर्षांच्या मुलीने तलवार घेऊन गावात गोंधळ घातला. तिने झोपलेल्या आपल्या 7 वर्षीय चुलत बहिणीवर तलवारीने वार केले. तिने तिचं शिर धडापासून वेगळं केलं.  रामजी यांच्या घरात हरियाली अमावस्य़ेला दशामाताची प्रतिमा स्थापन करून दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा केली जाते. रविवारीदेखीलही रात्री 8 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला होता. यादरम्यान शंकर यांची 15 वर्षांची मुलगी हातात तलवार घेऊन अंगात देवी आल्याचा हावभाव करू लागली. सर्वांना मारून टाकेन म्हणत तिने तलवार घेऊन अंगणाच्या दिशेने धावली. आधी तिने वडील आणि काकांवर हल्ला केला. यामुळे दोघेही जखमी झाले. यानंतर कुटुंबीय सैरा-वैरा पळू लागली. यादरम्यान त्याच घरात सुरेश यांची 7 वर्षांची मुलगी झोपली होती. मुलगी तिच्यावर गेली. तिला खेचत दुसरीकडे आणलं आणि तलवारीने तिच्या मानेवर वार केले. यात 7 वर्षांच्या मुलीचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं. कसं बसं करून मुलीला पकडण्यात आलं. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात