लखनऊ, 9 मे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) गाजियाबाद येथील आर्यदीप हॉटेलमध्ये 4 मे च्या रात्री महिलेची हत्या (Women Killed) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीसह हॉटेल मालक, मॅनेज आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्रेयसीसोबत शरीर संबंध ठेवता न आल्यानं न्यूनगंडात व्यक्तीने महिलेची हत्या केली आणि फरार झाला. अलीगढ येथे राहणारी प्रियंका (48) तब्बल 4 वर्षांपासून पतीपासून वेगळी गाजियाबाद येथे राहत होती. 4 मे च्या रात्री तब्बल साडे 11 वाजता ती एका व्यक्तीसह आर्यदीप हॉटेलमध्ये होती. साधारण अडीच वाजता महिलेसोबत आलेली व्यक्ती हॉटेलमधूनच फरार झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी हॉटेलचे मॅनेजर विजय यादवने महिलेचा मृतदेह असल्याची सूचना दिली. हॉटेलचे रजिस्टर चेक केल्यानंतर प्रियंकासह आलेल्या व्यक्तीचं नाव सतीश लिहिलं होतं. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवर हत्याची केस दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा खुलासा करीत आरोपी नौशाद खान पठाण याला अटक करण्यात आली. त्याने पोलिसांना सांगितलं की, तो 4 मे रोजी कामासाठी रेल्वे स्टेशनवर गेला होता. येथे त्याची भेट प्रियंकासोबत झाली. काही वेळ बोलल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. यानंतर रात्री दोघं आर्यदीप हॉटेलला पोहोचले. नौशादचं म्हणणं आहे की, येथे आम्ही शरीर संबंध ठेवू शकलो नाही. ज्यानंतर प्रियंका त्याच्यासोबत भांडण करू लागली. यामुळे न्यूनगंडातून त्याने प्रियंकाचा गळा दाबू तिची हत्या केली. आणि दोघांचे फोन घेऊन फरार झाला. हे ही वाचा- महिलेचा पती नपुंसक; माजी IAS अधिकाऱ्याने सुनेला खोलीत बोलावलं अन्… धक्कादायक म्हणजे हॉटेलमधून बाहेर पडताना नौशादने घटनेची माहिती हॉटेलच्या मालकाला दिली होती. तरीही पोलिसांना दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती देण्यात आली. मॅनेजरने त्यांच्याकडून ओळखपत्रही घेतलं नाही. रजिस्टरमध्ये त्याचं नाव सतिश अशी नोंद केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.