भिवंडी, 09 डिसेंबर : 19 वर्षीय नवविवाहित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून पतीने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील (Bhiwandi) गायत्रीनगर परिसरातील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.
अहमद रजा शहा (वय 20 ) असं अटकेत असलेल्या पतीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पतीने पत्नीच्या विविध कारणावरुन हत्या केल्याच्या 11 महिन्यात भिवंडीतील ही सहावी घटना आहे.
'पृथ्वीवर लपलेल्या एलियन्सचा मंगळावर अड्डा, याबाबत ट्रम्प करणार होते घोषणा पण..'
भिवंडी शहरातील गायत्रीनगर परिसरातील रामनगरमध्ये एका चाळीत आरोपी अहमद हा 19 वर्षीय मृतक पत्नीसह राहत होता. आरोपी पती हा एका लूम कारखान्यात कामगार म्हणून काम करीत होता. विशेष म्हणजे, चार महिन्यापूर्वीच दोघांचा निकाह झाला होता. मात्र आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून पती -पत्नीमध्ये रोज भांडण होत होती.
प्रताप सरनाईकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, EDच्या कारवाईला स्थगिती
रविवारी 6 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी पत्नीची ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून पतीने हत्या केली. त्यांनतर घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला तसंच आरोपी पती अहमद रजा याला अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण कबाडी करीत आहेत.
भिवंडीत गेल्या 11 महिन्यात सहावी घटना
- भिवंडी शहरातील गायत्रीनगर इथं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी अँगल मारून केली निर्घृण हत्या
- तालुक्यातील पुर्णा या गावात शुल्लक वादातून पतीने लोखंडी पाईप डोक्यावर, तोंडावर, पायावर मारून पत्नीची केली होती निर्घृण हत्या
- पुर्णा इथं आपल्या पोटच्या अकरा महिन्याच्या बाळाला पत्नीने स्तनपान करण्यास नकार दिल्याच्या रागातून गुरुद्वारात पुजारी म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात उभ्या पंख्याच्या खालील लोखंडी रॉड घालून केली होती हत्या
- शहरातील श्रीरंग नगर परिसरात राहणाऱ्या पती पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणात राग अनावर झालेल्या पतीने पत्नीच्या गळ्यास चादर आवळून व तोंडावर उशी दाबून तिची हत्या केल्याची घटना घडली होती
- पत्नीची तिच्या प्रियकरासोबत नग्न अवस्थेतील मोबाईलवर व्हिडीओ क्लिप पाहताच पतीने पत्नीची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. ही घटना गेल्याच महिन्यात भिवंडीतील नागांव रोडवरील एका चाळीत घडली होती. त्यावेळी पत्नीची निर्घृण हत्या करून पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
दरम्यान, या सहाही घटना पाहता लॉकडाउन काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर पती-पत्नीमधील वाढत्या रक्तरंजित हिंसाचार वाढल्याने भिवंडीत हा चर्चेचा विषय ठरला आहे.