नवी दिल्ली, 09 डिसेंबर: एलियन्स अर्थात परग्रहवासी यांच्याबाबत माणसांमध्ये कुतूहल गेल्या अनेक वर्षांपासून आहे. एलियन्स पाहिल्याचे दावे देखील अनेकांनी केले आहेत. अनेक सिनेमांमधून देखील हा विषय हाताळण्यात आला आहे. मात्र अद्याप एलियन्स (Aliens) खरंच अस्तित्त्वात आहेत का याबाबत कोणताही ठोस पुरावा हाती लागला नाही आहे. अशावेळी इस्रायलच्या एका संशोधकाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. या संशोधकाचा असा दावा आहे की, पृथ्वीवर एलियन्स आहेत. ते सध्या लपले असून हे एलियन्स अमेरिका आणि इस्रायलच्या देखील संपर्कात आहेत. इस्रायलचे अंतराळ सुरक्षा मोहिमेचे माजी प्रमुख हैम इशेद यांनी हा दावा केला आहे. हैम इशेद यांचा दावा आहे की, पृथ्वीवर या एलियन्सचं छुपं वास्तव्य आहेत. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याबाबत घोषणा करणार होते, पण एलियन्सनीच त्याना रोखलं असा अजब दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की याबाबत मंगळावरील जमिनीवर एक अड्डा देखील बनवला आहे, एक गॅलेक्टिक फेडरेशन बनवून अमेरिकेबरोबर याबाबत एक गुप्त करार देखील झाला आहे. इस्रायलच्या Yediot Aharonot शी बोलताना 87 वर्षीय हैम इशेद यांनी याबाबत माहिती दिली आहे. (हे वाचा- ‘ही’ आहेत जगातील सर्वोत्कृष्ट संसद भवनं; थक्क करतं यांचं सौंदर्य ) या फेडरेशनच्या एलियन्सीच ट्रम्प यांना घोषणा करण्यापासून थांबवले आहे. मीडिया अहलावालानुसार इशेद यांचं असं म्हणणं आहे की यामागे या परग्रहवासीयांचा एक मनसुबा आहे. त्यांना ब्रह्मांडाची माहिती मिळवायची आहे आणि त्याकरता ते अमेरिकन एजंटांना जाऊन मिळाले आहेत. इशेद यांचे अजब दावे इशेद यांच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 2011 मध्ये त्यांच्या निवृत्तीनंतर स्थानिक मीडियाने त्यांना ‘इस्रायलच्या सॅटलाइट कार्यक्रमाचा जनक’ म्हणून देखील नावाजले होते. ते या दाव्यावर ठाम आहेत की मंगळावर एलियन्सचा अड्डा आहे, ज्याठिकाणी अमेरिकन एजंट आणि एलियन्स राहत आहेत. एलियन्सना ब्रह्मांडाचा शोध घ्यायचा आहे, तशी त्यांनी करारावर सही देखील केली आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यांमागची सत्यता समोर येण्याची वाट पाहिली जात आहे.
We are aware of @galacticfederation communications with #HaimEshed. @the_mnistry continues to be a vigilant advocate of the obscure even in trying times.#galacticfederation #aliens #undergroundMarsbase
— The Ministry Of Peculiarities (@the_mnistry) December 9, 2020
इशेद यांच्या मते एलियन्सबाबत ही माहिती समोर येण्यासाठी पृथ्वीवरील मानवजातीच्या मनाची तयारी होणं आवश्यक आहे. तसंच त्यांना समजुतदार व्हावं लागेल. इशेद यांनी असं देखील मान्य केलं आहे की, त्यांची ही माहिती अनेकांनी नाकारली आहे, त्यांना वेडं ठरवलं गेलं. पण ते असंही म्हणतात की त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आहे. त्यांच्याकडे डिग्री, पुरस्कार आहेत. त्यांनी एक पुस्तक देखील लिहीलं आहे. त्यांच्या मते पृथ्वीला अणुयुद्धाच्या धोक्यापासून एलियन्सनीच वाचवले आहे.