हैद्राबाद, 31 मे : हैद्राबादमधून (Hyderabad News) हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे एका महिलेने विवाहबाह्य संबंधाच्या संशयाने पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार घडवून आणला. महिलेला संशय होता की, तिच्या पतीचं त्याच्या मैत्रिणीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. इतकच नाही तर महिलेने मैत्रिणीवर केलेल्या बलात्काराचा व्हिडीओदेखील शूट केला. ही घटना सायबराबाद येथील आहे. येथील एका महिलेने दुसऱ्या महिलेवर बलात्कार घडवून आणण्यासाठी 5 लोकांना पैसे दिले. या महिलेवर तिचा संशय होता. पोलिसांनी महिलेसह 6 जणांना केलं अटक पोलिसांनी आरोपी महिला गायत्रीसह 6 जणांना अटक केली आहे. गायत्रीच्या कोंडापूर स्थित घरात 5 लोकांनी महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्रीचा पती श्रीकांत UPSC ची तयारी करीत असताना कोचिंगमध्ये पीडितेला भेटला होता. पीडिता वरचेवर गायत्रीच्या घरी तिच्या पतीला भेटायला येत होती. यानंतर 2021 ऑक्टोबर ते फेब्रवारी 2022 पर्यंत ती गायत्रीसोबत तिच्याच घरात राहिली. यानंतर गायत्रीचा संशय बळावला. बऱ्याच वादानंतर महिलेने गायत्रीचं घर सोडलं. असा आरोप करण्यात येत आहे की, 26 मे रोजी गायत्रीने पीडितेला आपल्या घरी बोलावलं. यावेळी गायत्रीने हायर केलेल्या पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला आणि याचा एक व्हिडीओ शूट केला. यानंतर पीडितेला धमकी देऊन सोडण्यात आलं. यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.