अमित राय, मुंबई 01 ऑक्टोबर : मुंबईला लागून असलेल्या डोंबिवलीमध्ये तरुणीने लग्नाला नकार दिल्याने एका प्रियकराने स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी पोलिसांची रात्रभर धावपळ सुरू होती. मात्र, तो तरुण जेव्हा समोर आला तेव्हा त्याचं बोलणं ऐकून पोलीसही चकित झाले. डोंबिवलीत तरुणीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या प्रियकराने मुलीला आणि तिच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी जे केलं ते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांना यात गोवण्यासाठी आरोपी तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा कट रचला. यानंतर त्याचं अपहरण झाल्याचा संदेश आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवला. नातेवाईकांनी दिलेल्या अपहरणाच्या तक्रारीवरून डीसीपी, एसीपी, वरिष्ठ पीआय आणि पोलिसांचं पथक रात्रभर अपहरणकर्त्याचा शहरभर शोध घेत राहिलं. अखेर 10 तासांच्या तपासानंतर रामनगर पोलिसांना प्रियकराला पकडण्यात यश आलं. खाण्याचं पार्सल दिलं, तरुणीकडून पैसे घेतले अन्…डिलिव्हरी बॉयचं घृणास्पद कृत्य डोंबिवली पूर्वेकडील दत्त नगर परिसरात हा प्रियकर कुटुंबासह राहतो. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेल्यानंतर त्याने सांगितलं की, त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. मात्र मुलीचं कुटुंब लग्नासाठी तयार नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या मित्रांनीही प्रियकराला समजावलं होतं, मात्र प्रियकर ते मानायला तयार नव्हता. मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर संतप्त प्रियकराने तरुणीला आणि तिच्या मित्रांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाची कहाणी रचली होती. यानंतर तरुणाने स्वतःचे कपडे फाडले आणि रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्या लिहिलं होतं की “आम्ही तुमच्या मुलाचं अपहरण केलं आहे. पोलिसांना याची माहिती दिल्यास घरी थेट त्याचा मृचदेहच येईल.” यानंतर घाबरलेल्या वडिलांनी राम नगर पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. भावाचा फोन केला हॅक अन् बहिणीबद्दल पाठवले नको ते मेसेज, परभणीतील घटना पोलीस रात्रभर या तरुणाचा शोध घेत राहिले. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांचं पथक रात्रभर अपहरणकर्त्याच्या शोधात धावत राहिलं. दहा तासांच्या तपासानंतर पोलीस मोबाइल लोकेशनच्या मदतीने घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण खुलासा झाला. या व्यक्तीने स्वतःच्याच अपहरणाची खोटी कथा रचली होती आणि आपल्या वडिलांना अपहरण झाल्याचा खोटा मेसेजही केला होता. रामनगर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.