अहमदनगर, 31 मे: राज्यात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून विविध पातळीवर उपाययोजना केली जात आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा फटका हा लहान मुलांना बसणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवरही प्रशासनानं उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राज्यातल्या अहमदनगर (Ahmednagar) मध्ये मे महिन्यात जवळपास 8 हजारहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली. कोविड- 19 (COVID-19 ) च्या तिसऱ्या लाटेत संसर्ग कमी करण्यासाठी राज्यानं अतिरिक्त पावलं उचलली आहेत. ज्यात मुलांवर कमी परिणाम होईल. सांगली (Sangli cit) जिल्ह्यात लहान मुलांसाठी खास कोविड-19चा वॉर्ड तयार करण्याचं काम सध्या सुरु आहे. या वॉर्डमध्ये पाच मुलांवर सध्या उपचार सुरु असून अधिक लहान मुलांसाठी ही सुविधा तयार केली जात आहे. आम्ही लहान मुलांसाठी कोविड वॉर्ड तयार केला आहे. जेणेकरुन जर तिसरी लाट आली तर आम्ही त्यासाठी तयार असू. तसंच आम्ही मुलांसाठी असा वॉर्ड तयार केला आहे की त्यांना रुग्णालयात नाही तर शाळेत किंवा नर्सरीमध्ये आल्याचा अनुभव येईल, असं नगरसेवक अभिजित भोसले यांनी म्हटलं आहे. अहमदनगरमध्ये मे महिन्यात जवळपास 8 हजारहून अधिक लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली. जिल्ह्यातील जवळपास 10 टक्के प्रकरणे नोंदली गेली. यानंतर प्रशासनानं आपली पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनानं आता तिसरी लाटेची (third wave) तयारी सुरु केली असून सध्या बालरोग तज्ज्ञांशी बातचित सुरु आहे. फक्त मे महिन्यातच 8 हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. हे चिंताजनक असल्याचं अहमदनगरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार असणं आवश्यक असल्याचं आमदार संग्राम जगताप म्हणालेत. जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली. सध्या राज्य सरकारकडून जिल्हा पातळीवर चर्चा सुरु असल्याचंही बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







