जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'देवा मला भिकारी केलंस, मी तुला सोडणार नाही', तरुणाने देवांवरच काढला राग

'देवा मला भिकारी केलंस, मी तुला सोडणार नाही', तरुणाने देवांवरच काढला राग

'देवा मला भिकारी केलंस, मी तुला सोडणार नाही', तरुणाने देवांवरच काढला राग

देशात लॉकडाऊन (Lock down) जाहीर झाल्यानंतर याचा फटका देशातील अनेकांना बसला आहे. दरम्यानच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. अशाच एका रोजगार गेलेल्या तरुणाने याचा राग देवावर काढला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 एप्रिल: भारतात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर याचा फटका देशातील अनेक नागरिकांना बसला आहे. दरम्यानच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रोजगार गेल्याने एका तरुणाने याचा राग देवावर काढला आहे. त्याने मंदिरातील देवतांच्या मूर्तींवर हल्ला करत अनेक मूर्तींची तोडफोड (Young man break idols of gods) केली आहे. या प्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्याने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Accused arrest) केली आहे. देवानं आपल्याला भिकारी बनवल्यानं आपण संबंधित मूर्तींची तोडफोड केल्याची कबुली आरोपी तरुणाने दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित 28 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव विक्की असून त्याने राजधानी दिल्लीतील पश्चिमपुरी परिसरातील एका मंदिरावर हल्ला केला आहे. काल रात्री त्याने पश्चिमपुरी परिसरातील मंदिरावर हल्ला करून अनेक मुर्त्यांची तोडफोड केली आहे. संबंधित आरोपी हा भंगार गोळा करण्याचं काम करत होता. पण लॉकडाऊनच्या काळात त्याचा व्यवसाय बंद पडला. आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडल्याने त्याला परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करावा लागला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नऊच्या सुमाराचा पश्चिमपुरीतील वैष्णो देवीच्या मंदिराचा पुजारी राम पाठक मंदिरात आले, तेव्हा रात्री घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मंदिरातील शंकरासहित अन्य दोन देवतांच्या मूर्ती जागेवर नव्हत्या. सोबतच इतर मूर्तींनाही हानी पोहचवण्यात आली होती. यानंतर मंदिराचे पुजारी राम पाठक यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. हे ही वाचा - दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रवास केल्यानं युवकाला मारहाण; चाकूनं हल्ला याप्रकरणी पोलिसांनी 28 वर्षाच्या विक्की नावाच्या युवकाला अटक केली आहे. आरोपी विक्की भंगार गोळा करण्याचं काम करायचा पण त्याचा धंदा चौपट झाल्याने त्याने याचा राग देवावर काढला आहे. सध्या विक्की भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो. आरोपीने चौकशीदरम्यान सांगितलं की, ‘लॉकडाऊनपूर्वी त्याचा भंगाराचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे त्याने देवाला म्हटलं होतं की, ‘मला भिकारी केलंस याचा बदला नक्की घेईल.’ त्यामुळे त्याने मंदिरातील मूर्तींची तोडफोड केल्याची कबुली दिली आहे. पण पोलीस संबंधित आरोपीच्या मानसिक स्थितीबाबतही तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात