रायपूर, 19 डिसेंबर: एका नवजात स्त्री अर्भकाला (Newborn baby girl) कुणीतरी गावातील भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) तावडीत सोडून निघून गेलं होतं. रात्रभर गावातील भटक्या कुत्र्यांनी या मुलीची (Dogs take care of baby) काळजी घेतली. सकाळी ग्रामस्थांना जेव्हा भटक्या कुत्र्यांच्या गर्दीत नवजात बाळ रडताना दिसलं, तेव्हा त्यांना जबर धक्का (Shock) बसला. रस्त्यावर पडलेलं आणि रडत असलेलं एक नवजात बाळ आणि त्याच्याभोवती जमलेले भटके कुत्रे पाहून सकाळी गावकऱ्यांना जबर धक्का बसला.
कुत्र्यांमध्ये फेकलं बालिकेला
24 तासांपेक्षाही कमी वय असणाऱ्या एका नवजात बालिकेला भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सोडण्यात आलं होतं. छत्तीसगडमधील मुंगेली भागात ही घटना घडली. या भागातील लोरमी नावाच्या गावात जेव्हा सकाळी ग्रामस्थ जागे झाले, तेव्हा त्यांना कुत्र्यांच्या गराड्यात एक बाळ रडताना दिसलं. ग्रामस्थांनी याची कल्पना सरपंचांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला उचलून घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ही बातमी पोलिसांना समजल्यानंतर पोलीसही हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
बाळ होतं सुरक्षित
या बाळाला कुठलीही इजा झाली नव्हती. भटक्या कुत्र्यांमध्ये आणि कडाक्याच्या थंडीत रात्रभर हे बाळ कसं राहिलं, याचंच सर्वांना आश्चर्य वाटत होतं. मात्र कुत्र्यांनी तिला कुठलीही हानी पोहोचवण्याऐवजी तिची काळजी घेतल्याचं दिसून आलं. कुत्र्यांनी चाटून चाटून तिला स्वच्छ केलं होतं आणि रात्रभर तिला उब देण्याचंही काम केलं होतं. यामुळे मुलीचे प्राण वाचले.
क्रूर आईवडील
मुलीला अशा प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या ताब्यात देणारे क्रूर आईवडील एका बाजूला आणि रात्रभर तिची काळजी घेणारे कुत्रे दुसऱ्या बाजूला. माणसांपेक्षा कुत्र्यांमध्येच अधिक माणुसकी असल्याची प्रचिती या घटनेतून आली.
हे वाचा - अजबच! माणूस नव्हे तर झाडाच्या प्रेमात पडली महिला; अखेर घेतला मोठा निर्णय
बेवारस मुलगी सुरक्षित
या मुलीला हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यानंतर चाईल्ड लाईनकडे सोपवण्यात येणार आहे. मुलगी झाली, या कारणावरूनच कदाचित तिच्या आईवडिलांनी तिला रस्त्यावर फेकलं असावं, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Small baby