पुणे, 28 ऑगस्ट : तरुणी तिची मावशी आणि मावस भाऊ रेल्वेने पुण्याला येत होते. मात्र, भोपाळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वी पीडित मुलगी रेल्वेतील स्वच्छतागृहात गेली. तेथून बाहेर येत असताना आरोपीने तिला पुन्हा स्वच्छतागृहात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी न्यायालयाने धावत्या रेल्वेत बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मावस भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही संतापजनक घटना आठ वर्षांपूर्वी 14 जुलै 2015 रोजी हरिद्वार ते पुणे धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी मावशीच्या घरी घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने नराधम मावस भाऊला शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी हा निकाल दिला. आरोपी हा ‘मर्चंट नेव्ही मधील इंजिनीअर आहे. तसेच त्याचे वय 32 वर्ष आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) (एफ) नुसार बलात्कार आणि कलम 307 नुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली. याबाबत पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडितेचा खून करण्याचा प्रयत्न - पीडितेसोबत ही संतापजनक घटना घडल्यानंतर ती घाबरुन गेली होती. त्यामुळे तिने पुण्यात आल्यावर याबाबत तिच्या मावशीला आणि मैत्रिणीला सांगितले. यानंतर दुसऱ्या दिवशी पीडितेच्या मैत्रिणी तिच्या मावशीच्या घरी आल्या. त्यावेळी पीडिता त्यांना रेल्वेत घडलेली घटना सांगत असताना आरोपी मावस भाऊसुद्धा तेथे आला. यावेळी त्याने पीडितेला जमिनीवर ढकलले आणि तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मावशीने आणि पीडितेच्या मैत्रिणीने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी नराधमाने त्यांनाही मारहाण केली आणि घरातून पळ काढला. यानंतर त्याच्यावर भोसरी एमआयडीसी आणि भोपाळ रेल्वे पोलीस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, धमकावणे यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडितेची मावशी आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. हेही वाचा - पुणे : लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध; Video ची धमकी देऊन पत्नीला वेश्याव्यवसायात ढकललं आरोपीने मावस बहिणीवर बलात्कार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सप्रे यांनी केला. हा युक्तिवाद न्यायालयान ग्राह्य धरला आणि आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.