मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कल्याणमधली धक्कादायक घटना! लेकानेच केला आईबापाचा खून, रचली भलतीच कहाणी

कल्याणमधली धक्कादायक घटना! लेकानेच केला आईबापाचा खून, रचली भलतीच कहाणी

पोटच्या मुलानेच पोटात चाकू खुपसून आईवडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोटच्या मुलानेच पोटात चाकू खुपसून आईवडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोटच्या मुलानेच पोटात चाकू खुपसून आईवडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कल्याण, 24 डिसेंबर:  कल्याणमध्ये (Kalyan) झालेला पती आणि पत्नीचा खून (Murder of husband and wife) हा त्यांच्याच मुलाने (Son) केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात (Police investigation) झाला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आईवडील आणि त्यांचा मुलगा यांच्यावर नेमका कुणी हल्ला केला असावा, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. अखेर हा खून मुलानेच केल्याचं स्पष्ट झालं असून त्यासाठीचे काही ठोस पुरावेदखील पोलिसांना मिळाले आहेत. मुलानेच आपल्या आईवडिलांचा खून करून वडिलांवर आळ टाकण्याचा प्रयत्न केल्याचं आतापर्यंतच्या पोलीस चौकशीतून समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याणमध्ये राहणारे 58 वर्षांचे प्रमोद बाणेरिया आणि त्यांची पत्नी कुसूम यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. पोलीस घटनास्थळ दाखल झाले, तेव्हा दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांचा मुलगा लोकेश हादेखील जखमी झाला होता आणि तोही तिथंच होता. वडिलांनी रागाच्या भरात आपला आणि आईचा खून करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती लोकेशनं पोलिसांना दिली. मात्र पोलिसांना यात वेगळ्याच कारस्थानाचा वास येत होता. लोकेशच्या महणण्यावर विश्वास ठेवायला पोलीस तयार नव्हते.

लोकेशच्या आईची जबानी

पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा लोकेशची आई गंभीर जखमी होती, मात्र जिवंत होती. तिच्यावर उपचार सुरू असताना तिने पोलिसांना लोकेशनचे हा खून केल्याची माहिती सांगितली. काही दिवसांतच लोकेशच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईच्या मृत्यूपूर्व जबाबाला प्रमुख पुरावा बनवत पोलिसांनी लोकेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचा - आईला त्रास देणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा; VIDEO होतोय व्हायरल

हे आहे कारण

आईवडिलांच्या सतत होणाऱ्या भांडणांना लोकेश वैतागला होता. वडिलांचं रोजचं दारू पिणं आणि त्यानंतर आईसोबत होणारी भांडणं यामुळे वैतागलेल्या लोकेशनं दोघांनाही संपवण्याचा निर्णय घेतला.

First published:

Tags: Crime, Murder, Son