मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलाने सुपारी देऊन केला वडिलांचा खून, नाराजीचं कारण ऐकून येईल संताप

मुलाने सुपारी देऊन केला वडिलांचा खून, नाराजीचं कारण ऐकून येईल संताप

सख्ख्या मुलाने त्याच्या वडिलांचा एका अत्यंत किरकोळ कारणासाठी सुपारी देऊ खून केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.

सख्ख्या मुलाने त्याच्या वडिलांचा एका अत्यंत किरकोळ कारणासाठी सुपारी देऊ खून केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.

सख्ख्या मुलाने त्याच्या वडिलांचा एका अत्यंत किरकोळ कारणासाठी सुपारी देऊ खून केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.

  • Published by:  desk news

सोनीपत, 4 जानेवारी: मुलाने (Son) आपल्याच वडिलांची (Father) सुपारी देऊन त्यांचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांवर नाराज असलेल्या मुलाने आपल्या मित्रांना (Friends) वडिलांचा खून कऱण्यासाठी पैसे दिले. किरकोळ कारणावरून होत असलेल्या वादानंतर आपल्याच वडिलांना संपवण्याचा निर्णय त्याने घेतला आणि अत्यंत थंड डोक्याने तो अंमलात आणला. या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

वडिलांसोबत वाद

हरियाणातील सोनीपतमध्ये राहणाऱ्या राजेंद्र नावाचे गृहस्थ त्यांच्या मोहित नावाच्या मुलासोबत आणि कुटुंबीयांसोबत राहत होते. वडील आणि मुलगा यांच्यात किरकोळ कारणावरून सतत भांडणं होत असतं. त्यात सर्वात महत्त्वाचं कारण होतं पैशांचं. आपले वडील आपल्याला पैसे देत नाहीत, याचा मोहितच्या मनात राग होता. पैसे न देणाऱ्या वडिलांना मारून टाकून त्यांच्याकडील सर्व पैसे आणि मालमत्ता आपल्या नावे करून घेण्याचा डाव त्याने आखला.

मित्रांना दिली सुपारी

मोहितने त्याच्या दोन मित्रांना वडिलांच्या हत्येची सुपारी दिली. सचिन आणि मनदीप या दोन मित्रांना त्याने 7 लाख रुपयांची सुपारी दिली आणि आपल्या वडिलांचा खून करून त्याचे पुरावे नष्ट करण्याची सूचना केली. त्यापैकी 3 लाख रुपये ऍडव्हान्सही दिला. त्या पैशातून मित्रांनी ऍडव्हान्स देत एक होंडा सिटी गाडी खरेदी केली.

असा केला खून

सचिन आणि मनदीप हे मोहितच्या वडिलांना निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांचा खून केला. त्यांचा मृतदेह त्यांनी होंडा सिटी गाडीत घालून गंगा नदीपात्रात फेकून दिला. मृतदेह वाहत जाईल आणि त्याचा कधीच कुणाला थांगपत्ता लागणार नाही, असं त्यांना वाटत होतं. दरम्यान, मोहितनं पोलीस ठाण्यात जात आपले वडील घरातून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

हे वाचा- जुळ्यांच्या जन्माने रचला इतिहास, पहिला जन्मला 2021 मध्ये तर दुसरा 2022 साली

असा लागला खुनाचा शोध

पोलिसांनी मोहितच्या वडिलांचा शोध घेत असताना मोहित आणि त्याच्या काही मित्रांकडे चौकशी केली. त्यावेळी संदीप आणि मनजितसोबत काहीजणांनी त्याच्या वडिलांना पाहिल्याचं पोलिसांना समजलं. त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सत्य परिस्थिती पोलिसांना सांगितली. पोलिसांन मोहितलाही अटक केली असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Father, Murder, Police, Son