Home /News /crime /

Aurangabad Crime : मुलाकडून वडील आणि सावत्र आईचा खून, तिसऱ्या दिवशी असा झाला घटनेचा खुलासा

Aurangabad Crime : मुलाकडून वडील आणि सावत्र आईचा खून, तिसऱ्या दिवशी असा झाला घटनेचा खुलासा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

श्यामसुंदर यांचे श्री बालाजी क्लॉथ स्टोअर्स या नावाने गजानननगर येथे दुकान आहे. याठिकाणी पहिल्या मजल्यावर दुकान आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर श्यामसुंदर हे त्यांचा मुलगा देवेंद्र, मुलगी वैष्णवी आणि पत्नीसह राहत होते.

  औरंगाबाद, 24 मे : कौटुंबिक वादातून औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. (Aurangabad Crime News) औरंगाबाद शहरातील गजानननगर (Gajanan Nagar Aurangabad) येथे ही घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. काय आहे घटना -  श्यामसुंदर यांचे श्री बालाजी क्लॉथ स्टोअर्स या नावाने औरंगाबादच्या गारखेडा येथील गजानननगर येथे दुकान आहे. याठिकाणी पहिल्या मजल्यावर दुकान आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर श्यामसुंदर हे त्यांचा मुलगा देवेंद्र, मुलगी वैष्णवी आणि पत्नीसह राहत होते. त्यांचा मुलगा देवेंद्र हा दहावी पास आहे. तो आपल्या वडिलांना दुकान चालवायला मदत करायचा. दोन्ही बाप आणि मुलामध्ये दुकान चालवण्यावरुन वाद होत होते. हे वाद इतके टोकाला गेले की या वादाचे रुपांतर खुनातच झाले. या कौटुंबिक वादातून आणि अनैतिक संबंधातून मुलाने जन्मदात्या पित्याची आणि सावत्र आईचीच हत्या केली. श्यामसुंदर हिरालाल कलंत्री (वय 61) आणि अश्विनी श्यामसुंदर कलंत्री (45) अशी मृतांची नावे आहेत. मुलीला महाविद्यालयात सोडण्यासाठी श्यामसुंदर शनिवारी सकाळी गेले होते. या दरम्यान त्यांच्या मुलाने सावत्र आईचा खून केला आणि मृतदेह हा बेडरुममधील दिवाणाच्या आत ठेवला. यानंतर वडिल श्यामसुंदर यांचाही खून केला. (Father and Stepson Murder) असा झाला खुनाचा उलगडा - वडिलांचा खून केल्यावर आरोपीने तो गच्चीवरील पत्र्याच्या खोलीत टाकून दिला. यानंतर सावत्र बहिणीला फोन करत सांगितले की, वडिलांच्या मित्राचा अपघात झाल्यामुळे तिघेही धुळ्याला जात आहोत. तु सरळ काकाच्या घरी जा. यानंतर ती शनिवारी काकाकडे गेली. यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर तीने आपल्या भावाला फोन केला. तर तो आम्ही थोड्या वेळात पोहोचत आहोत, असे सांगत दिवसभर खोटं बोलत राहिला. यानंतर त्याने मोबाईलच बंद केले. हेही वाचा - Nagpur Murder : नागपूर हादरलं! दारुड्या बापाने केला 10 वर्षाच्या मुलाचा खून, कारण ऐकून तुम्हीही हादराल
  तिसऱ्या दिवशी श्यामसुंदर यांची मुलगी वैष्णवी ही काकाच्या घरून आपल्या घरी आली. यानंतर यावेळी तिला घरात दुर्गंधी येऊ लागली. तिच्यासोबत तिची मैत्रिणही होती. यामुळे तिने घरात कशाची दुर्गंध येत असल्याचे पाहिले तर तिला हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर तिला धक्काच बसला. यानंतर तिने थेट पोलीस ठाणे गाठले.
  आरोपी मुलाचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध - वैष्णवीने तिचा भाऊ देवेंद्रच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मुलाला शिर्डी येथून अटक केली. आरोपी देवेंद्र हा 27 वर्षांचा आहे. त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Aurangabad News, Murder

  पुढील बातम्या