कानपूर, 8 फेब्रुवारी : लग्न सोहळ्यांमध्ये वाद-विवाद झाल्याच्या अनेक घटना घडतात. अशाच एका वादामुळे उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका व्यक्तीचा भयानक घटना घडली. ही व्यक्ती नवरदेवाचा चुलत भाऊ होता. स्वतंत्र कुशवाह उर्फ मुनी (41, रा. गणेश नगर, रावतपूर) असं या व्यक्तीचं नाव आहे.
काय आहे संपूर्ण घटना -
मुनी यांनी सोमवारी (6 फेब्रुवारी) रात्री काकवान रोड, बिल्हौर येथील अर्पित गेस्ट हाउसमध्ये वेटरकडे गरम जेवणाची मागणी केल्यानं वाद झाला होता. संतप्त वेटर्सनी मुनी यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. या मारामारीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वरदेवाचा चुलत भाऊ होता. स्वतंत्र कुशवाह उर्फ मुनी यांचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप आहे. 'अमर उजाला'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशीर झाल्यानंतर मुनी यांनी वेटर्सकडे गरम जेवणाची मागणी केली होती. रात्री उशीर झाल्याचे सांगत आणि आचारी निघून गेल्याचं कारण देऊन वेटर्सनी गरम जेवण देण्यास नकार दिला. या प्रकरणावरून मुनी यांचा वेटर्सशी वाद झाला. संतप्त वेटर्सनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. डोक्याला मार लागल्यामुळे मुनी यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मुनीचा लहान लहान भाऊ आशिषच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृताच्या डोक्यातील अनेक हाडं तुटल्याचं आढळलं आहे. स्वतंत्र कुशवाह उर्फ मुनी हे एका टीव्ही चॅनलचे कॅमेरामन होते. त्यांच्या पश्चात पत्नी अंजू आणि तीन मुली असं कुटुंब आहे. नातेवाईकांनी सांगितलं की, सोमवारी मुनी हे आपले चुलते श्रीराम यांचा मुलगा मनीषच्या लग्नासाठी बिल्हौरला गेले होते. एसीपी आलोक सिंह यांनी सांगितलं की, तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
हेही वाचा - आलिशान हॉटेलचे फोटो दाखवले, महाराष्ट्रातील 2 भामट्यांनी गुजरातमधील 20 जणांना लाखोंना लुटले
हल्लेखोर दारूच्या नशेत होते -
गेस्ट हाउसचे संचालक सोहम प्रकाश उर्फ बबलू कटियार यांनी सांगितलं की, शहरातील सिंहवाहिनी लक्ष्मीबाई नगर येथे राहणारे बाल किशन कुशवाह यांची मुलगी काजल हिचं गेस्ट हाउसमध्ये लग्न होतं. रावतपूर येथून वरात आली होती. वर पक्षातील लोक रात्री उशिरा जेवत होते. त्यावेळी गेस्ट हाउसच्या बाहेर काही मद्यधुंद लोकांनी एकमेकांशी वादावादी करून हाणामारी केली. उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण शांत होण्याऐवजी वाढतच गेलं.
सकाळपर्यंत लपवून ठेवण्यात आली घटना -
अर्पित गेस्ट हाउसमध्ये झालेल्या भांडणानंतर वधू-वर पक्षांनी लग्नाचे सर्व विधी घाईत पार पाडले. यानंतर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सगळा सोहळा आटोपता घेतला. मृत व्यक्तीचे काका योगेंद्र यांनी सांगितलं की, घटनास्थळी पोहोचताच त्यांना स्वतंत्र उर्फ मुनीच्या मृत्यूची बातमी मिळाली. ही गोष्ट त्यांनी घरच्यांपासून लपवून ठेवली. विवाह सोहळा पार पडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला माहिती देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kanpur, Marriage, Uttar pradesh