• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • ब्लॅकमेलर जावई : सासऱ्यावर केली बलात्काराची खोटी केस, तक्रार करणारी महिला गोंधळल्यामुळे फुटलं बिंग

ब्लॅकमेलर जावई : सासऱ्यावर केली बलात्काराची खोटी केस, तक्रार करणारी महिला गोंधळल्यामुळे फुटलं बिंग

आपल्या सासऱ्यांकडून (father in law) पैसे उकळण्यासाठी (blackmail) त्यांच्यावर बलात्काराची खोटी केस (fake rape case) टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या जावयाचं (son in law) बिंग फुटल्याची घटना उघडकीला आली आहे.

 • Share this:
  जबलपूर, 22 ऑगस्ट : आपल्या सासऱ्यांकडून (father in law) पैसे उकळण्यासाठी (blackmail) त्यांच्यावर बलात्काराची खोटी केस (fake rape case) टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या जावयाचं (son in law) बिंग फुटल्याची घटना उघडकीला आली आहे. मित्रासोबत संगनमत करून एका महिलेला त्यांनी बलात्काराची केस टाकण्यासाठी तयार केलं. मात्र प्रत्यक्ष तक्रार आणि महिलेच्या बोलण्यातून अनेक विरोधाभास समोर आल्यामुळे या प्रकाराचा पर्दाफाश झाला. अशी होती योजना मध्यप्रदेशातील जबलपूरच्या लव कोष्टा याचं मदनचंद कोष्टा यांच्या मुलीशी लग्न झालं होतं. सासऱ्याकडे असणारी संपत्ती कशी मिळवता येईल, याच्या विचारात असणाऱ्या लवनं त्याचा मित्र दीपक अहिरवारसोबत एक योजना आखली. दीपकची मैत्रिण असणाऱ्या शबाना परवेझला त्यांनी कटात सहभागी करून घेतलं. शबानाला पोलीस ठाण्यात जाऊन लवचे सासरे मदनचंद कोष्टा यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार द्यायला सांगितलं. या बदल्यात तिला 10 हजार रुपये देण्याचंही त्यांनी कबूल केलं. ही तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात महिलेनं मदनचंद कोष्टा यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. तक्रार देताना भांबावली महिला बलात्काराची तक्रार देणाऱ्या शबानाच्या बोलण्यात पोलिसांना विसंगती आढळून येऊ लागली. गेल्या 4 वर्षांपासून मदनचंद आपल्यावर बलात्कार करत असल्याची तक्रार तिने पोलिसांकडे केली होती. आपलं लग्न झालं असून 1 वर्षांचं मूल असल्याचंही तिने सांगितलं होतं. यासारखे अनेक विरोधाभास दिसल्यामुळे पोलिसांनी खोदून खोदून माहिती विचारली असता शबाना घाबरली आणि तिने सत्य परिस्थिती पोलिसांना सांगितली. हे वाचा -भयंकर ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या जावयाविरुद्ध तक्रार हा प्रकार समजल्यानंतर सासऱ्यांनी आता जावयाविरोधात तक्रार नोंदवली आहे. बलात्काराची खोटी तक्रार करून 5 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. मदनचंद कोष्टा यांच्या मुलीशी लवने पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यानंतर काही महिन्यात त्याचं पहिलं लग्न झालेलं असल्याचं तिला समजलं. तिच्यावर लव आणि त्याच्या पहिल्या पत्नीकडून अत्याचारही होत होते. त्यामुळे ती लवचं घर सोडून माहेरी निघून गेली होती.
  Published by:desk news
  First published: