गडचिरोली, 05 जुलै: विदर्भातील (Vidarbha) सर्वच जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीचं (Crime in Vidarbha) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात पोलीस हवालदाराच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील महिला शेतात गेली मात्र संध्याकाळ झाली तरी घरी न परतल्यामुळे शोधाशोध सुरु झाली असता तिचा मृतदेह शेतात आढळून आला आहे. या महिलेची हत्या (Crime news) करण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे.
शीलाबाई पुंडलिक कासारे (वय ५५) असं या महिलेचं नाव आहे. शिलाबाई या आपल्या दोन मुलांसोबत शेतात पेरणीसाठी गेल्या होत्या. दुपारी त्यांची दोन्ही मुलं घरी परत आलीत. मात्र त्या शेतातच थांबल्या होत्या. संध्याकाळ झाल्यानंतरही शिलाबाई घरी परत आल्या नाहीत हे बघून त्यांचे दोन्ही मुलं त्यांना शोधण्यासाठी शेतात गेले. अंधार झाल्यामुळे ही मुलं आईला आवाज देत होती.
हे वाचा - VIDEO : नागपूरचा जल्लाद; प्रेमात धोका दिला म्हणून मुलीचं अपहरण करून लैंगिक शोषण
संपूर्ण शेत पिंजून काढल्यानंतर त्यांना एक मृतदेह दिसून आला. जवळ जाऊन बघताच शिलाबाई या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. आईचा मृतदेह बघून दोन्ही मुलांनी हंबरडा फोडला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेची हत्या कोणी आणि कोणत्या कारणामुळे केली असेल याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.