जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Crime News: आई-पत्नीच्या भांडणाला वैतागला मुलगा; आधी जन्मदातीला गळा दाबून संपवलं आणि मग...

Crime News: आई-पत्नीच्या भांडणाला वैतागला मुलगा; आधी जन्मदातीला गळा दाबून संपवलं आणि मग...

Crime News: आई-पत्नीच्या भांडणाला वैतागला मुलगा; आधी जन्मदातीला गळा दाबून संपवलं आणि मग...

Crime news: आई- पत्नीच्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या एका व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या जन्मदात्या 75 वर्षीय आईची गळा दाबून हत्या (Son killed mother by strangling) केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

झुंझुनूं, 02 मे: सासू-सूनेमध्ये भांडण होणं ही प्रत्येक कुटुंबातील सामान्य बाब आहे. पण आई- पत्नीच्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या एका व्यक्तीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या जन्मदात्या 75 वर्षीय आईची गळा दाबून हत्या (Son killed mother by strangling) केली आहे. एवढंचं नव्हे तर आरोपी मुलाने पुरावे नष्ट करण्यासाठी आईच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तिला जाळूनही टाकलं आहे. पण त्याने केलेला गुन्हा तो फार काळ लपवू शकला नाही. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी त्याची पोलखोल केली आहे. संबंधित घटना ही राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील आहे. येथील सूरजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुवीरपुरा याठिकाणी शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याबाबतची माहिती आरोपी मुलगा अशोक कुमार याने स्वतः पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या हत्येप्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासूनचं मुलगा अशोक कुमारवर संशय होता. यानंतर पोलिसांनी अशोक कुमार याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. तेव्हा सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली पण नंतर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सासू-सूनाच्या वादातून आईचा घेतला जीव दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित 75 वर्षीय मृत महिलेचं नाव शरबती देवी असून त्यांना तीन मुलं आहेत. त्या सध्या आपला दुसऱ्या नंबरचा मुलगा अशोक कुमारसोबत गावीच राहत होत्या. पण अशोक कुमारची पत्नी आणि त्यांच्यात नेहमी वाद होत होता. किरकोळ कारणावरून दररोज होणाऱ्या वादातून आरोपी मुलानं आपल्या आईची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळलं आहे. हे ही वाचा- माझ्याकडून पैसे घेते आणि इतर लोकांसोबत बोलते, संतापलेल्या प्रियकरानं उगवला सूड याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत हत्येचं गुढ उलगडलं असून आरोपी मुलाला अटक केली आहे. त्याच बरोबर या हत्येत सुनेचा काही संबंध आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. सध्या आरोपी मुलाला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात