मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सोलापूर पोलिसांची कमाल, महिलांची आंतरराज्यीय 'गोल्डन गँग' ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर पोलिसांची कमाल, महिलांची आंतरराज्यीय 'गोल्डन गँग' ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

सोलापुरातून पोलिसांनी दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या आंतरराज्यीय गँगचा भंडाफोड केला आहे.

सोलापुरातून पोलिसांनी दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या आंतरराज्यीय गँगचा भंडाफोड केला आहे.

सोलापुरातून पोलिसांनी दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या आंतरराज्यीय गँगचा भंडाफोड केला आहे.

सोलापूर, 20 ऑगस्ट : सोलापुरातून पोलिसांनी दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या आंतरराज्यीय गँगचा भंडाफोड केला आहे. आरोपी महिलांनी आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी चोरी केलीय? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांना या महिलांकडे पाच लाखांचे दहा तोळे दागिने मिळाले आहेत. पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले आहेत. पोलीस गेल्या तीन महिन्यांपासून या चोर महिलांच्या टोळीच्या मागावर होते. त्यांचा शोध घेत होते. अखेर एका ठिकाणी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर महिलांचा पत्ता पोलिसांना मिळाला. त्यातून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी महिलांना अटक केली.

मंगळवेढा येथील एसटी डेपो मॅनेजर यांच्या नातेवाईकांना एसटी प्रवास महागात पडला होता. 20 एप्रिल 2022 रोजी फिर्यादी चंद्रकला सुग्रीव दराडे (वय 52 ) या मंगळवेढा ते सोलापूर एसटी बसमधून प्रवास करत होत्या. त्यांच्याकडे बॅगेत सोन्याचे दागिने होते. हे दागिने 3 लाख 30 हजार किमतीचे 6.6 तोळे इतके होते, अशी माहिती त्यांनी तक्रारीत दिली होती.

संबंधित चोरीच्या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस तातडीने कामाला लागले होते. पोलिसांनी घटनेला गांभीर्याने घेतलं होतं. त्यामुळे तपासाला जलदगतीने सुरुवात झाली होती. या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांनी मंगळवेढा एसटी बस स्थानकारील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन महिला या एका दुकानाच्या बाजूला मोबाईलवर बोलताना दिसल्या. पोलिसांनी त्या महिलांबाबत दुकानदाराकडे विचारपूस केली. त्यावेळी महिलांनी दुकानदाराकडे फोन करण्यासाठी मोबाईल घेतल्याची माहिती समोर आली.

(डोकेदुखी सांगून सासरच्यांनी दिली गर्भपाताची गोळी, मानपानाचा बदला घेण्यासाठी दिराकडूनही लगट)

पोलिसांनी दुकानदाराकडून महिलांना नेमका कोणत्या नंबरवर कॉल केला होता याची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे सूत्रे हलविली आणि अखेर सोनं चोरी करणाऱ्या महिलांच्या गोल्डन गँगला ताब्यात घेतलं. पोलिसांनी या महिलांकडून पाच लाखांचे 10 तोळे सोने जप्त केले आहे.

पोलिसांनी आरोपी महिलांची चौकशी केली असता आणखी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. सोलापूर येथील दोन महिला चोरट्यांनी सोने लंपास करून दुसया चोरट्याकडे दिले होते. या महिला कळंब येथील होत्या. त्यांनी ते चोरीचे सोने जालना जिल्ह्यातील सराफाला विकले होते. संबंधित माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जालना येथील दुकानदाराकडून नेकलेस, कानातील फुले, नथ, पेंडल मंगळसूत्र असे 3 लाख 30 हजार किमतीचे 6.6 तोळे दागिने हस्तगत केले आहे.

या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी मंगळवेढा पोलिसांना तीन जिल्ह्यात तपास करून आरोपींना पकडले. यामध्ये अंजली रामू भुई, गीता बालाजी भोगी, कीर्ती शिन भुई, ज्योती बालाजी भोगी (सर्व रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) अशी त्या महिलांची नावे आहेत. सदरचे सोने हे राहुल उर्फ रवी उर्फ मल्लेश गजावार (वय 30, रा. मुकुंदवाडी, जि. औरंगाबाद) याच्याकडे दिल्याचे स्पष्ट झाल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

First published:

Tags: Crime, Thieves